🕒 1 min read
Maratha Reservation | जालना: गेल्या पंधरा दिवसापासून मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात आंदोलन करत आहे. त्यांच्या या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.
त्यानंतर आज सर्वपक्षीय बैठकीतील ठरावाची प्रत मनोज जरांगे यांना अर्जुन खोतकर यांनी दिली आहे. त्यानंतर मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आरक्षण पत्र मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
I always work transparently – Maratha Reservation
मनोज जरांगे म्हणाले, “मी नेहमी पारदर्शकपणे काम करतो. मी तुमच्यापुढे अजिबात जाणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला विचारल्याशिवाय मी कोणताही पाऊल उचलणार नाही.
सर्वपक्षीय बैठकीमध्ये मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला आहे. या ठरावाची एक प्रत मला सोपवण्यात आली आहे.
आपण सर्व एकत्र आल्यामुळे सरकारला हा निर्णय घ्यावा लागला आहे. मात्र, आरक्षणाचं पत्र सर्वसामान्य मराठ्यांच्या हातात पडेपर्यंत आंदोलन थांबणार नाही.”
दरम्यान, आज मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी संभाजी भिडे उपोषण स्थळी दाखल झाले आहे. यानंतर संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे.
त्यांच्या पाठिंब्यावर प्रतिक्रिया देत मनोज जरांगे म्हणाले, “आज संभाजी भिडे यांनी आमच्या आंदोलनाला पाठिंबा दाखवला आहे. एकाचा पाठिंबा घ्यायचा आणि दुसऱ्याचा नाकारायचा हे आमचं धोरण नाही.
त्यांच्या पाठिंब्यानंतर आमची ताकद वाढली आहे. कुणीही आलं तरी आम्ही त्यांचा पाठिंबा स्वीकारणार आहोत. त्यामुळे आमची ताकद वाढणार आहे. सध्या आमच्यासाठी भावना नाही तर आरक्षण (Maratha Reservation) महत्त्वाचं आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Nitesh Rane | कुठल्याच बाजूने उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे पुत्र वाटत नाही – नितेश राणे
- Keshav Upadhye | तोंड उघडलं की गटारगंगा; केशव उपाध्येंची भास्कर जाधवांवर टीका
- Rohit Pawar | राज्य सरकारच कंपनीला कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या – रोहित पवार
- Maratha Reservation | मनोज जरांगे उपोषण मागे घेणार? राज्य सरकारचं शिष्टामंडळ जरांगेंच्या भेटीला
- Maratha Reservation | एकाचा पाठिंबा घ्यायचा व दुसऱ्याचा नाकरायचा हे आमचे धोरण नाही; संभाजी भिडेंच्या पाठिंब्यावर जरांगेंची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











