🕒 1 min read
Nana Patole | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये G-20 परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. नुकतीच ही परिषद संपलेली असून आता सर्वांचं लक्ष संसदेच्या विशेष अधिवेशनाकडं लागलं आहे. केंद्र सरकारने 18 सप्टेंबर पासून संसदेचं विशेष अधिवेशन बोलवलं आहे.
परंतु, हे अधिवेशन कशासाठी बोलवण्यात आलं आहे? हे अद्याप सरकारने जाहीर केलेलं नाही. त्यामुळे या अधिवेशनावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे.
याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर खोचक टीका केली आहे. या अधिवेशनामध्ये देशाचे तुकडे होणार असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. नाना पटोले यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
The country will be divided in the special session of Parliament – Nana Patole
नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, “संसदेच्या विशेष अधिवेशनाचा अजेंडा अजून केंद्र सरकारने स्पष्ट केलेला नाही. त्यामुळे संसदेच्या विशेष अधिवेशनात देशाचे तुकडे होणार, असं वाटत आहे.
विदर्भातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी वेगळा विदर्भ करू, अशा चर्चा होत्या. त्याचप्रमाणे मुंबईला केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा प्लॅन सुरू झाला आहे.”
दरम्यान, 18 सप्टेंबर 2023 पासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. देशाचं नाव फक्त भारत ठेवायचं, एक निवडणूक एक देश, समान नागरी कायदा इत्यादी मुद्द्यांवर या अधिवेशनामध्ये चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संसदेनं हे अधिवेशन पुढे ढकलावं, अशी मागणी देखील केली जात आहे.
त्यामुळे हे अधिवेशन होणार की नाही? अधिवेशन झालं तर त्यामध्ये नक्की काय होईल? कोणते नवीन प्रस्ताव मांडले जातील? अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित झाले आहे. त्यामुळे संसदेच्या या विशेष अधिवेशनामुळे राज्यासह देशातील राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | मराठा आरक्षण हाच माझा उपचार – मनोज जरांगे
- Girish Mahajan | थोड्यादिवसांनी उद्धव ठाकरेंसोबत कुणीही राहणार नाही – गिरीश महाजन
- Devendra Fadnavis | आपल्या आरक्षणात कुणी वाटेकरी होईल, असा ओबीसीने गैरसमज करू नये – देवेंद्र फडणवीस
- Eknath Shinde | मराठा समाजाने निर्णय घेण्यासाठी आम्हाला थोडा वेळ दिला पाहिजे – एकनाथ शिंदे
- Chandrashekhar Bawankule | ओबीसी आणि मराठा दोघांच्या हक्कांवर गदा येणार नाही – चंद्रशेखर बावनकुळे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











