Share

Radhakrishna Vikhe Patil | पवित्र भंडारा माझ्यावर उधळला याचा मला आनंद – राधाकृष्ण विखे पाटील

🕒 1 min readRadhakrishna Vikhe Patil | सोलापूर: राधाकृष्ण विखे पाटील आज सोलापूर दौऱ्यावर आहे. आज ते सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात थांबले आहे. धनगर कार्यकर्ते शेखर बंगाळे काही कार्यकर्त्यांसह राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटायला आले होते. यावेळी त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळत धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी बंगाळे … Read more

Published On: 

🕒 1 min read

Radhakrishna Vikhe Patil | सोलापूर: राधाकृष्ण विखे पाटील आज सोलापूर दौऱ्यावर आहे. आज ते सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात थांबले आहे. धनगर कार्यकर्ते शेखर बंगाळे काही कार्यकर्त्यांसह राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटायला आले होते.

यावेळी त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळत धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी बंगाळे यांना मारहाण केली. त्यानंतर आता या प्रकरणावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Bhandara is considered very sacred – Radhakrishna Vikhe Patil

राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले, “भंडारा हा अत्यंत पवित्र मानला जातो. या पवित्र भंडाऱ्याची माझ्यावर उधळण झाली आहे. याचा मला अत्यंत आनंद आहे. प्रत्येकाची प्रतिकारात्मक भावना व्यक्त करण्याची एक वेगळी पद्धत असते.

त्यामुळे त्यांनी काही वेगळं केलं, असं मला वाटत नाही. कोणतीही घटना घडली की त्या घटनेची स्वाभाविक प्रतिक्रिया असते. अचानक भंडारा उधळल्यामुळे सुरक्षा रक्षकांकडून मारहाण झाली.

कारण त्यांच्यावर माझ्या सुरक्षेची जबाबदारी आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई आणि गुन्हे दाखल न करण्याची सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिली आहे.

दरम्यान, या प्रकरणावर भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar)  यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “भंडारा समस्त बहुजन समाजासाठी आस्थेचं आणि श्रद्धेचं प्रतीक आहे. त्यामुळे आंदोलनासाठी भंडाऱ्याचा वापर करणे योग्य नाही.

लोक भंडारा खंडोबाचा आणि बिरोबाचा आशीर्वाद म्हणून कपाळाला लावतात. जर काही लोकांनी राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर भंडारा उधळला असेल, तर तो त्यांनी खंडोबाचा आशीर्वाद समजावा.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!