🕒 1 min read
Maratha Reservation | जालना: गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. मराठा आरक्षणासाठी गेल्या दहा दिवसापासून मनोज जरांगे (Manoj Jarange) उपोषणाला बसले आहे.
काहीही झालं तरी उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका जरांगे यांनी स्पष्ट केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कुणबी जात प्रमाणपत्रासंदर्भात निर्णय घेतलेला असून मनोज जरांगे यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती.
राज्य सरकारच्या या विनंतीवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारच्या निर्णयाचा आम्हाला काहीच उपयोग नाही, असं जरांगे यांनी म्हटलं आहे.
None of us have pedigree papers – Maratha Reservation
मनोज जरांगे म्हणाले, “आमचं शांतपणे आंदोलन सुरू आहे. आमचे सहकारी रुग्णालयात अजूनही उपचार घेत आहे. मात्र, तरीही शांततेत आम्ही उपोषण करत आहोत.
सरकारने काढलेल्या अध्यादेशाचे आम्ही स्वागत करतो. मात्र, सरकारचा हा निर्णय आमच्या काहीच उपयोगाचा नाही. सरकारनं वंशावळी नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय मागे घ्यावा.
संपूर्ण मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकारने जाहीर करावा. कारण आमच्या कुणाकडेच वंशावळीचे दस्तावेज नाहीत.”
दरम्यान, मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज दहावा दिवस आहे. उपोषणाच्या दहाव्या दिवशी जरांगे यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. यानंतर आरोग्य विभागाचं एक पथक उपोषण स्थळी दाखल झालं आहे.
मनोज जरांगे यांची रक्त चाचणी करण्यात आली. मनोज जरंगे यांचा बीपी कमी झाला आहे. त्याचे त्यांच्या किडनीवर परिणाम होताना दिसत आहे.
ते पाण्याचे सेवन करत नसल्यानं युरीन आउटपुट देखील कमी झालं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. या माहितीनंतर मराठा कार्यकर्त्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Supriya Sule | अजित दादा पुन्हा राष्ट्रवादीत येतील का? सुप्रिया सुळे म्हणाल्या…
- Sanjay Raut | सनातन धर्माबाबत उदयनिधी स्टॅलिन यांचं वैयक्तिक मत असू शकतं – संजय राऊत
- Eknath Shinde | मुख्यमंत्री शिंदेंचा काँग्रेसला दणका! नांदेडमध्ये बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
- Rohit Pawar | CM शिंदेंनी मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसू नये – रोहित पवार
- Maratha Reservation | मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; उपोषणस्थळी डॉक्टरांची टीम दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











