🕒 1 min read
Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: मराठा समाज आरक्षणासाठी जालना जिल्ह्यामध्ये आंदोलन करत आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे.
आज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना आज अस्वस्थ वाटत असल्यामुळे उपोषण स्थळीचं त्यांना सलाईन लावण्यात आली आहे. अशात सकल मराठा समाज महाराष्ट्र यांनी पोलीस महानिरीक्षक यांना देण्यात आलेल्या निवेदनात एक मागणी केली आहे. मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी, असं सकल मराठा समाज महाराष्ट्रने म्हटलं आहे.
Give Z plus security to Manoj Jarange
मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यानंतर हे आंदोलन आणखीनच तीव्र झालं आहे.
या घटनेनंतर अनेक पक्षाचे नेते आंदोलन स्थळी येऊन जरांगे यांची भेट घेऊन गेले आहे. अशा परिस्थितीत मनोज जरांगे यांच्या जिवाला काही समजांकडून हानी पोहोचवली जाऊ शकते.
मनोज जरांगे यांच्या जीवाला काही झालं तर महाराष्ट्रातील मराठा समाज चवताळून उठेल आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात हिंसा घडू शकते.
या सर्व गोष्टी टाळण्यासाठी मनोज जरांगे यांच्या जिवाचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी त्यांना झेड प्लस सुरक्षा पुरवावी, असं सकस मराठा समाज महाराष्ट्र यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. आज त्यांची प्रकृती खालावलेली दिसून आली आहे. काहीही झालं तरी आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका जरांगे यांनी स्पष्ट केली आहे.
मनोज जरांगे म्हणाले, “सरकारने माझा जीव घ्यायचं ठरवलं आहे. दोन वर्षापासून मी सरकारसोबत फक्त तह करत आहे. सरकारने या दोन वर्षांमध्ये मला काहीच दिलं नाही.
सरकारच्या मनात नक्की काय चाललं आहे? याबद्दल मला काहीच माहित नाही. फक्त आशेच्या आधारावर आमचं हे आंदोलन सुरू आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Prakash Ambedkar | इंडिया-भारत वादात विरोधी पक्ष भाजपच्या ट्रॅपमध्ये अडकलाय – प्रकाश आंबेडकर
- Asim Sarode | CM शिंदे यांचा राजीनामा घेण्यासाठी कारणं तयार केली जात आहे का? – असीम सरोदे
- Pankaja Munde | बॉम्बेचं जसं मुंबई होऊ शकतं, तसंच इंडियाचं भारत होऊ शकतं – पंकजा मुंडे
- Pankaja Munde | आता नुसती आश्वासनं नको; मराठा आरक्षणावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया
- Maratha Reservation | सरकारने माझा जीव घ्यायचं ठरवलंय – मनोज जरांगे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











