Share

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या ताकदीत वाढ! माजी खासदार पुन्हा एकदा ठाकरे गटात

Uddhav Thackeray | मुंबई: शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर ठाकरे गटातील नेते शिंदे गटात प्रवेश करताना दिसत होते. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या चिंतेत वाढ झाली होती. या सर्व घटनेनंतर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मोर्चे बांधणीला सुरुवात केली. अशात उद्धव ठाकरे यांच्या ताकतीत वाढ झाली आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure) यांनी आज पुन्हा एकदा … Read more

Published On: 

Uddhav Thackeray | मुंबई: शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर ठाकरे गटातील नेते शिंदे गटात प्रवेश करताना दिसत होते. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या चिंतेत वाढ झाली होती.

या सर्व घटनेनंतर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मोर्चे बांधणीला सुरुवात केली. अशात उद्धव ठाकरे यांच्या ताकतीत वाढ झाली आहे.

माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure) यांनी आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशानंतर ठाकरेंच्या ताकतीत वाढ तर शिंदेंच्या चिंतेत भर पडली आहे.

आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानी संगमनेर, शिर्डी आणि नाशिकच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

त्याचबरोबर या कार्यकर्त्यांनी मातोश्री बाहेर जोरदार घोषणाबाजी केली. उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणांनी मातोश्री परिसर दणाणून गेला होता.

त्यानंतर माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाला पाठिंबा दर्शवला आहे. या घटनेनंतर ठाकरे गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Haridas Bhade will also join the Thackeray group

दरम्यान, भाऊसाहेब वाकचौरे यांच्यानंतर हरिदास भदे ( Haridas Bhade) देखील ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

यासंदर्भात हरिदास भदे यांची उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) यासंदर्भात बैठक होणार आहे. या बैठकीनंतर त्यांचा पक्ष प्रवेशाचा निर्णय होणार आहे.

या माहितीनंतर एकनाथ शिंदे यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. या पक्षप्रवेशानंतर ठाकरे गटाची ताकद नक्कीच वाढणार आहे. तर दुसरीकडे या पक्षप्रवेशाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही