Share

Eknath Shinde | मुख्यमंत्री शिंदेंची बदनामी केल्यामुळे किशोर पाटलांचे समर्थक आक्रमक! पत्रकारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Eknath Shinde | जळगाव: जळगाव जिल्ह्यातील पत्रकार संदीप महाजन (Sandeep Mahajan) यांना काही अज्ञातांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. आमदार किशोर पाटील (Kishore Patil) यांना शिवीगाळ केल्यामुळं हा प्रकार घडला असल्याचं बोललं जात आहे. मात्र, किशोर पाटील यांच्या सांगण्यावरून ही मारहाण झाली असल्याचं संदीप महाजन यांनी म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार किशोर पाटील यांच्या समर्थकांनी … Read more

Published On: 

Eknath Shinde | जळगाव: जळगाव जिल्ह्यातील पत्रकार संदीप महाजन (Sandeep Mahajan) यांना काही अज्ञातांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती.

आमदार किशोर पाटील (Kishore Patil) यांना शिवीगाळ केल्यामुळं हा प्रकार घडला असल्याचं बोललं जात आहे. मात्र, किशोर पाटील यांच्या सांगण्यावरून ही मारहाण झाली असल्याचं संदीप महाजन यांनी म्हटलं आहे.

याच पार्श्वभूमीवर आमदार किशोर पाटील यांच्या समर्थकांनी जळगाव जिल्ह्यात मोर्चा काढला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि आमदार किशोर पाटील यांची बदनामी केल्यामुळं संदीप महाजन यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी किशोर पाटील यांच्या समर्थकांनी केली आहे.

A case be filed against Sandeep Mahajan

काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यात एका 08 वर्षीय मुलीवर बलात्कार करून त्याची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर पत्रकार संदीप महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाब विचारत त्यांच्यावर टीका केली होती.

यानंतर आमदार किशोर पाटील यांनी महाजन यांना शिवीगाळ केल्याची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. त्यानंतर महाजन यांना काही अज्ञातांकडून मारहाण करण्यात आली होती.

ही मारहाण किशोर पाटील यांच्या सांगण्यावरून करण्यात आली असल्याचं संदीप महाजन यांनी म्हटलं होतं. या सर्व प्रकरणानंतर किशोर पाटील यांच्या समर्थकांनी संदीप महाजन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. .

पत्रकार संदीप महाजन हे खंडणीखोर पत्रकार आहेत, असं म्हणत किशोर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी पाचोरा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला आहे.

संदीप महाजन यांनी आमदार किशोर पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, त्याचबरोबर लोकप्रतिनिधी असलेल्या नेत्यांची बदनामी केल्याच्या कारणावरून संदीप महाजन यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी किशोर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही