Share

K. Chandrashekar Rao | शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसही फुटणार – केसीआर

K. Chandrashekar Rao | कोल्हापूर: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात कधी काय घडेल? हे सांगणे आता अवघडच नाही तर अशक्य झालं आहे. अशात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मोठं विधान केलं आहे. केसीआर कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी एक धक्कादायक आणि मोठा गौप्यस्फोट केला … Read more

Published On: 

K. Chandrashekar Rao | कोल्हापूर: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात कधी काय घडेल? हे सांगणे आता अवघडच नाही तर अशक्य झालं आहे. अशात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मोठं विधान केलं आहे.

केसीआर कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी एक धक्कादायक आणि मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

तुम्ही एनडीएन किंवा इंडिया आघाडीसोबत का गेला नाही? या प्रश्नाचं उत्तर देत केसीआर (K. Chandrashekar Rao) म्हणाले, “आम्ही तिसरी आघाडी म्हणून काम करत नाही. त्याचबरोबर आम्हाला एनडीएन आणि इंडिया दोन्हीच्याही बाजूनं जायचं नाही.

आमची काम करण्याची पद्धत बघून बऱ्याच पक्षांनी आमच्यासोबत संपर्क साधला आहे. लोकांना आम्ही नवीन पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

Congress is also going to split in Maharashtra – K. Chandrashekar Rao

पुढे बोलताना ते (K. Chandrashekar Rao) म्हणाले, “गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार आम्हाला भारतीय जनता पक्षाची बी टीम म्हणत होते. मात्र, आज त्यांच्या पक्षाची काय परिस्थिती झाली आहे, हे सर्वांनाच दिसत आहे.

महाराष्ट्रामध्ये आधी शिवसेना फुटली. त्यानंतर अजित पवारांनी बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले. आता महाराष्ट्रामध्ये काँग्रेसही फुटण्याच्या मार्गावर आहे.”

दरम्यान, अजित पवार सत्तेत सामील झाल्यापासून ते राज्याचे भावी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. या चर्चा सुरू असतानाच केसीआर (K. Chandrashekar Rao) यांनी मोठं विधान केलं आहे.

त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येईल? हे पाहण्यासारखं असेल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही