Share

Narendra Modi | देश जळत असताना पुरस्काराच्या मेजवान्या का? मोदींच्या पुणे दौऱ्यावर काँग्रेस निशाणा

Narendra Modi | पुणे: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (01 ऑगस्ट) रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यावर पंतप्रधान मोदींना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे. त्याचबरोबर मोदींच्या या दौऱ्यावर अनेक विकास कामांचं लोकार्पण देखील केलं जाणार आहे. मोदींच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकारण तापलेलं दिसून आलं आहे. Youth Congress has opposed Narendra … Read more

Published On: 

Narendra Modi | पुणे: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (01 ऑगस्ट) रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यावर पंतप्रधान मोदींना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे.

त्याचबरोबर मोदींच्या या दौऱ्यावर अनेक विकास कामांचं लोकार्पण देखील केलं जाणार आहे. मोदींच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकारण तापलेलं दिसून आलं आहे.

Youth Congress has opposed Narendra Modi’s visit to Pune

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात युवक काँग्रेसकडून जागोजागी पोस्टर्स लावण्यात आले आहे. या पोस्टरच्या माध्यमातून युवक काँग्रेसने नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पुणे दौऱ्याला विरोध दर्शवला आहे.

मोदीजींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसकडून पुण्यात ‘मन की बात बंद करो मनिपुर की बात करो’, ‘देश जळत असताना पुरस्काराच्या मेजवान्या का?’, ‘गो बॅक क्राईम मिनिस्टर’ अशा मजकुराचे बॅनर लावण्यात आले आहे.

या बॅनर्सनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुणे दौऱ्यावर असणार आहे. ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ स्वीकारण्यासाठी ते पुणे दौऱ्यावर येत आहेत.

या पुरस्कार सोहळ्यास मोदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) देखील उपस्थित राहणार आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर पहिल्यांदाच नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे एका व्यासपीठावर दिसणार आहेत. त्यामुळं या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही