Ashish Shelar | “घरबसल्या मुलाखत देण्यापेक्षा…”; आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका

Ashish Shelar | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘आवाज कुणाचा’ या पॉडकास्टसाठी मुलाखत घेतली आहे. त्यांच्या या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसारित झाला आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. त्याचबरोबर या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर खोचक टीका … Read more

Published On: 

Ashish Shelar | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘आवाज कुणाचा’ या पॉडकास्टसाठी मुलाखत घेतली आहे.

त्यांच्या या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसारित झाला आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. त्याचबरोबर या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे.

याच पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीनंतर आशिष शेलार यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहे.

Does the importance of cricket really end in Mumbai? – Ashish Shelar

ट्विट करत आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले, “◆मुंबईला काय घातक आहे?
◆मुंबई महापालिका निवडणुका कोण कोर्टात गेल्यामुळे रखडल्यात?
◆मुंबईला कुणी किती वर्षे लुटली?
◆मुंबईतून काय बाहेर गेलं आणि काय आलं?
◆क्रिकेटचं महत्त्व मुंबईतून खरंच संपतंय का?
◆सामने मुंबई बाहेर खरंच जाणार का?

पुढे ते (Ashish Shelar) म्हणाले, “मुंबईकरांच्या अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यावीच लागणार! घरबसल्या मुलाखत देण्यापेक्षा, चला तर मग…सोडा अहंकार… व्हा दिलदार…टोमणे मारणे सोडा.. चाहे तों शामियाना लगाने का हमं करते है खर्चा आता होऊन जाऊ दे चर्चा!!”

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या या मुलाखतीनंतर विरोधक आणि सत्ताधारी पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचं दिसून आलं आहे. त्यांच्या या मुलाखतीवर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहे.

अशात आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उद्धव ठाकरे काय उत्तर देतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही