🕒 1 min read
Uddhav Thackeray | मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसारित झाला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही मुलाखत घेतली आहे.
या भागामध्ये उद्धव ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. त्याचबरोबर या भागात त्यांनी विरोधकांच्या इंडिया (INDIA) आघाडीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही परिवार वाचवण्यासाठी एकत्र आलो असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
My country is my family – Uddhav Thackeray
विरोधकांच्या इंडिया आघाडीवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “कोविड काळामध्ये मी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही संकल्पना राबवली होती.
आज ही संकल्पना संपूर्ण देशात राबवण्याची वेळ आली आहे. विरोधक म्हणतात परिवार वाचवण्यासाठी सगळे विरोधक एकत्र आले आहे. मग सत्ताधारी काय सत्तेसाठी एकत्र आले आहे का?
मी आज ठामपणे सांगतो होय आम्ही परिवार वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. माझा देश माझा परिवार आहे आणि त्याला वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “मी जशास तसे उत्तर देणारा व्यक्ती आहे. अरे ला कारे करणारा आहे. त्यामुळं मी आत्तापर्यंत लढलो आहे. सध्या ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातील सरकार स्थापन झालं आहे, ते कसं स्थापन झालं?
हे तळागाळातील पोरसुद्धा सांगू शकेल. उद्या खोके घेऊन, बंदुका घेऊन येतील आणि कोणीही देशाचा पंतप्रधान आणि राज्याचा मुख्यमंत्री होईल.”
“भारतीय जनता पक्षामध्ये आता राम शिल्लक राहिलेला नाही. त्यांच्यात आता फक्त आयाराम उरला आहे. भाजपचा राम कधीच मेला आहे. आता फक्त आयाराम बाकी गयाराम.
या आयारामांना तुमच्या पक्षात स्थान देताना तुमच्या पक्षातील मूळ राम होता, त्याला तुम्ही फक्त कामापुरता वापरला आहे का? तुमच्या पक्षातील मूळ रामाला तुम्ही कधी संधी देणार आहात का?”, असही ते यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Chandrashekhar Bawankule | उद्धव ठाकरेंना बहुधा अल्झायमरचा आजार झालयं – चंद्रशेखर बावनकुळे
- Sudhir Mungantiwar | राज ठाकरेंनी आयुष्यभर आमच्या सोबत येऊ नये, हीच सदिच्छा – सुधीर मुनगंटीवार
- Nana Patole | अजित पवारांनी सरड्यासारखा रंग बदलला – नाना पटोले
- Kirit Somaiya | किरीट सोमय्या यांच्या चिंतेत वाढ होणार! सोमय्यांचा व्हायरल व्हिडिओ खरा?
- Deepak Kesarkar | उद्धव ठाकरेंना संजय राऊतांची भाषा शोभत नाही – दीपक केसरकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











