Share

Uddhav Thackeray | शिवसैनिकानं उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त लिहिलं रक्तानं पत्र

🕒 1 min readUddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: उद्या 27 जुलै रोजी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. रायगड जिल्ह्यामध्ये घडलेल्या दुर्घटनेमुळे उद्धव ठाकरेंनी वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पण शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उद्धव ठाकरेंवर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहे. अशात 21 वर्षीय युवा शिवसैनिकांनं उद्धव ठाकरे … Read more

Published On: 

🕒 1 min read

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: उद्या 27 जुलै रोजी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. रायगड जिल्ह्यामध्ये घडलेल्या दुर्घटनेमुळे उद्धव ठाकरेंनी वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

पण शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उद्धव ठाकरेंवर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहे. अशात 21 वर्षीय युवा शिवसैनिकांनं उद्धव ठाकरे यांना वेगळ्या पद्धतीनं शुभेच्छा दिल्या आहे.

Rishikesh Gaikwad has written a letter in blood to Uddhav Thackeray

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील ऋषिकेश गायकवाड या तरुणांनं उद्धव ठाकरेंना रक्तांनं पत्र लिहिलं आहे.

या पत्राद्वारे ऋषिकेशनं उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. ऋषिकेश गायकवाड यांच्या या पत्रानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

“उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) साहेब तुम्हाला 40 गद्दार सोडून गेले. मात्र तरीही तुम्ही सह्याद्रीच्या पर्वतरांगेप्रमाणे तटस्थ उभे आहात.

एका कुटुंबप्रमुखाप्रमाणे तुम्ही महाराष्ट्राची काळजी घेतात. त्यासाठी आम्ही खूप आभारी आहोत. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी, यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना”, असं ऋषिकेश गायकवाड यांनी या रक्तानं लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ‘आवाज कुणाचा’ या पॉडकास्टला वाढदिवसानिमित्त मुलाखत दिली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) घणाघाती टीका केली आहे.

ते म्हणाले, “इर्शाळवाडीत शोधकार्य सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर होते. राज्यावर संकट कोसळलेलं असताना मुख्यमंत्र्यांना दिल्ली दरबारी जाऊन मुजरा करायचा होता.

तिकडे जाऊन ते कुणाला आणि कशासाठी मुजरा करताय?” उद्धव ठाकरे यांच्या या मुलाखतीनंतर शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचं दिसून आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!