Share

Hero Scooter | लवकरच लाँच होऊ शकते हिरोची ‘ही’ स्कूटर, जाणून घ्या स्पेसिफिकेशन

🕒 1 min read Hero Scooter | टीम महाराष्ट्र देशा: देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी हिरो (Hero) ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कारण हिरो नेहमी आपल्या ग्राहकांसाठी आकर्षक फीचर्ससह नवीन वाहने बाजारात लाँच करत असते. स्कूटर सेगमेंटमध्ये देखील हिरोने महत्त्वाचा वाटा देत गेल्या वर्षी अनेक स्कूटर लाँच केल्या आहेत. अशात मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी लवकरच … Read more

Published On: 

🕒 1 min read

Hero Scooter | टीम महाराष्ट्र देशा: देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी हिरो (Hero) ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कारण हिरो नेहमी आपल्या ग्राहकांसाठी आकर्षक फीचर्ससह नवीन वाहने बाजारात लाँच करत असते. स्कूटर सेगमेंटमध्ये देखील हिरोने महत्त्वाचा वाटा देत गेल्या वर्षी अनेक स्कूटर लाँच केल्या आहेत. अशात मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी लवकरच नवीन स्कूटर बाजारात दाखल करणार आहे. कंपनी ही स्कूटर 30 जानेवारी 2023 रोजी लाँच करू शकते. या स्कूटरचे नाव Hero Xoom 110cc असेल.

कंपनीने Hero Xoom 110cc या स्कूटरचा टीजर त्यांच्या सोशल मीडियावर अपलोड केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कंपनीने या स्कूटरची छोटीशी झलक दाखवली आहे. या स्कूटरचा लुक स्पोर्टी दिसत आहे. या स्कूटरमध्ये हॅण्डलबारच्या जागी X इंसिग्नियासोबत समोरच्या बाजूस एलईडी हेडलाईट उपलब्ध आहे.

https://twitter.com/rushlane/status/1617091463179042816?s=20&t=VZqrYDnzC1LMjc6EcSSdHw

हिरोच्या या स्कूटरमध्ये इन्स्ट्रुमेंट कन्सोल अंतर्गत स्टोरेज कंपार्टमेंट मिळू शकते. त्याचबरोबर इतर स्कूटरप्रमाणे या स्कूटरमध्ये USB फोन चार्जर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या स्कूटरमध्ये स्विच गिअरला एक स्विचेबल बटन i3s मिळेल. i3s हे हिरोचे फ्युल सेविंग स्टॉप/स्टार्ट फीचर आहे.

Hero Xoom 110cc या स्कूटरमध्ये 110.9cc इंजिन उपलब्ध असेल. हे इंजिन 8bhp पॉवर आणि 8.7Nm टार्क निर्माण करू शकेल. या स्कूटरचे स्पेसिफिकेशनबाबत बोलायचे झाले, तर यामध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फोर्स उपलब्ध असेल. Hero Xoom 110cc मध्ये पर्याय म्हणून अलॉय व्हील्स आणि फ्रंट डिस्क ब्रेक देखील मिळू शकतात.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही