उत्तर प्रदेशात पुन्हा भाजपचीच सत्ता? CJP चं आंदोलन सुरू असतानाच सर्व्हेचे धक्कादायक कल समोर

न्यूज १८ च्या सर्व्हेनुसार उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता येण्याचा अंदाज असून, तब्बल ६७ टक्के जनतेने भाजपवर विश्वास व्यक्त केला आहे.

Published On: 

MHD LOGO

प्रतिनिधी, 17 ऑक्टोबर: दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) मोठे आंदोलन सुरू असतानाच, आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा एक अत्यंत महत्त्वाचा सर्व्हे समोर आला आहे. न्यूज १८ ने केलेल्या या सर्वेक्षणात धक्कादायक कल हाती आले असून, राज्यात पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या सर्व्हेनुसार तब्बल ६७ टक्के जनतेने भाजपवर विश्वास दाखवत पुन्हा त्यांचेच सरकार स्थापन होण्याला पसंती दिली आहे. दुसरीकडे, इंडिया आघाडीत असलेल्या समाजवादी पार्टी आणि काँग्रेसला केवळ २७ टक्के लोकांचा पाठिंबा मिळाला असून हा त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीला पाच टक्के, तर इतर पक्षांना अवघ्या एक टक्का जनतेने पसंती दिली आहे.

सध्या दिल्लीमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सीजेपीकडून निदर्शने केली जात आहेत. यामध्ये त्यांनी सत्ताधारी भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे या आंदोलनात मोठ्या संख्येने ‘जेन झी’ (Gen Z) तरुण सहभागी झाले आहेत. आगामी निवडणुकीत या मतदारांची संख्या मोठी असणार असल्याने त्याचा नेमका काय परिणाम होईल, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

पुढच्या वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सध्या सत्तेत असलेल्या भाजपासह सर्वच प्रमुख पक्षांनी आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांतरालाही वेग आला असून, सपाच्या तीन विद्यमान आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्यानंतर समाजवादी पार्टीनेही भाजपचे पाच नेते फोडत मोठा झटका दिला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही