सत्तेत असताना तुम्ही फेल, आम्हाला मतदानातून बदल हवाय; संदीप देशपांडेंचे भाजपला प्रत्युत्तर

आझाद मैदानावरील ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भाजपवर निशाणा साधत मतदानातून सत्ता बदलणार असल्याचे ठणकावून सांगितले.

Published On: 

MHD LOGO

मुंबई, 16 ऑक्टोबर: मुख्य निवडणूक आयुक्त आणि सीजेपीच्या नेत्यांच्या अटकेविरोधात मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या 'लहरा दो तिरंगा' आंदोलनात मनसेने सहभाग नोंदवला. यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राजवट बदलण्याच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला. "तुम्ही सत्तेत असताना फेल ठरला आहात, त्यामुळे आम्हाला तुमची सत्ता नकोय. आम्हाला मतदानाच्या माध्यमातून बदल करायचा आहे," असे चोख प्रत्युत्तर देशपांडे यांनी दिले.

कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) वतीने आझाद मैदानावर 'तिरंगा फडकवूया देशाभिमान जागवूया' या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, तसेच सीजेपीचे नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांना करण्यात आलेल्या अटकेचा निषेध करण्यासाठी या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी दिली असून, लोकशाही टिकवण्यासाठी संदीप देशपांडे मनसेच्या वतीने यात सहभागी झाले.

ही कोणा एका पक्षाची लढाई नसून आपल्या सगळ्यांची आहे, असे स्पष्ट करत देशपांडे यांनी भाजपवर चौफेर टीका केली. सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी नुकत्याच एका पत्रकार परिषदेत 'राजवट बदलण्याबाबत' (रिजीम चेंज) भाष्य केले होते. त्यावरून केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूषण यांच्यावर कडाडून टीका केली होती. याच टीकेला उत्तर देताना देशपांडे म्हणाले की, "प्रशांत भूषण म्हणाले तसा आम्हालाही बदल हवा आहे, पण तो बदल मतदानातून हवाय."

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मतदानाचा अधिकार मोदी आणि अमित शाह हिरावून घेऊ शकत नाहीत, असा घणाघात त्यांनी केला. "जेवढा चेंडू दाबायचा प्रयत्न कराल, तेवढा तो जास्त उसळणार," असा इशाराही त्यांनी दिला. तसेच, शिवाजी पार्कमधील उदाहरणाचा संदर्भ देत, तिथे अनेक जण 'हाफ चड्ड्या' घालून फिरतात; मग तिथला गरबा लोकांसाठी आहे की 'चड्डीवाल्यांसाठी'? असा खोचक सवालही देशपांडे यांनी उपस्थित केला.

देशात अराजकता कोण पसरवत आहे, असा प्रश्न विचारत देशपांडे यांनी बँक खाजगीकरणाच्या मुद्द्यावरूनही सरकारला घेरले. आयडीबीआय बँकेसह इतर गोष्टी विकायला काढल्या आहेत, त्यावर आम्ही बोलायचे नाही का? आम्ही शांततेत तिरंगा हातात घेऊन आंदोलन करायचे ठरवले, तरी तुम्ही परवानगी देत नाही, अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली.

दरम्यान, सीजेपीकडून आज नवी दिल्लीतही 'लहरा दो तिरंगा' आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. कॅनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये हे आंदोलन होणार होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी यासंदर्भात अभिजीत दिपके यांना नोटीस बजावून आंदोलन न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, तसेच सीजेपीचे नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी या आंदोलनाची हाक देण्यात आली होती.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही