सातारा, 17 ऑक्टोबर: राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीमधील अंतर्गत नाराजी समोर येऊ लागली आहे. महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांनी त्यांच्या सातारा दौऱ्यात शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेण्याचे टाळल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. स्मिता जाधव सध्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या नियोजनात शंभूराज देसाई यांच्या भेटीचा उल्लेख होता. मात्र, प्रत्यक्ष दौऱ्यात ही भेट होऊ शकली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, शंभूराज देसाई हे सांगलीच्या दिशेने रवाना झाले. त्यामुळे या महत्त्वाच्या नेत्यांची भेट का टळली, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
साताऱ्यात आल्यावर डॉ. जाधव यांनी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मकरंद पाटील यांची आवर्जून भेट घेतली. पण महायुतीतील एका महत्त्वाच्या नेत्याला वगळल्यामुळे स्थानिक पातळीवर समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
राज्यातील ५ जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत पुण्याच्या जागेवरून महायुतीत आधीच धूसफूस पाहायला मिळत आहे. याआधी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा दिला होता. यानंतर राजकीय समीकरणांबाबत चर्चा रंगली होती.
शिंदेसेनेच्या या भूमिकेनंतर आता पदवीधर निवडणुकीतही नेत्यांच्या भेटीगाठींवरून मतभेद उघड होत असल्याचा अंदाज राजकीय निरीक्षक वर्तवत आहेत. डॉ. जाधव आणि देसाई यांची भेट न होण्यामागे खरंच अंतर्गत वाद आहे की हा केवळ दौऱ्याच्या नियोजनाचा भाग होता, हे संबंधित नेत्यांच्या स्पष्टीकरणानंतरच उलगडू शकेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी ५ जणांची शिफारस; इऑन मॉर्गन, आरोन फिंच शर्यतीत
- काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंदर नोव्हेंबरमध्ये विवाहबंधनात; पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्र्यांना आमंत्रण
- पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका पहिल्या सामन्यासाठी Dream11 टीम आणि प्रेडिक्शन
Quick Answers
डॉ. स्मिता जाधव यांनी त्यांच्या सातारा दौऱ्यात शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेण्याचे टाळले.
साताऱ्यात आल्यानंतर डॉ. स्मिता जाधव यांनी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मकरंद पाटील यांची आवर्जून भेट घेतली.
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा दिला होता.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






