मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी ५ जणांची शिफारस; इऑन मॉर्गन, आरोन फिंच शर्यतीत

आयपीएल २०२७ च्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने नव्या मुख्य प्रशिक्षकासाठी ५ नावांची यादी तयार केली असून त्यात इऑन मॉर्गन आणि आरोन फिंचचा समावेश आहे.

Published On: 

MHD LOGO

प्रतिनिधी, 17 ऑक्टोबर: आयपीएल २०२७ च्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने आपले मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांच्यासोबतचा प्रवास अधिकृतपणे थांबवला आहे. शनिवारी, १७ ऑक्टोबर रोजी फ्रेंचायझीने जयवर्धने यांच्या निरोपाची घोषणा केली. या निर्णयामुळे फ्रेंचायझीसोबतचा त्यांचा जवळपास एका दशकाचा अध्याय संपुष्टात आला आहे. आता मुंबई इंडियन्सच्या नव्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची असणार असून, यासाठी फ्रेंचायझीने ५ जणांची यादी निश्चित केली आहे.

'एनडीटीव्ही'च्या वृत्तानुसार, जयवर्धने यांची एक्झिट निश्चित होताच मुंबई इंडियन्सच्या अधिकाऱ्यांनी ५ नावांची यादी तयार केली आहे. या शर्यतीत ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मायकेल हसी हे सर्वात मोठे नाव मानले जात आहे. हसी त्याच्या रणनीतीसाठी आणि फलंदाजांसोबत काम करण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जातो. खेळाडू म्हणून कारकीर्द गाजवल्यानंतर त्याने चेन्नई सुपर किंग्समध्ये स्टीफन फ्लेमिंगच्या मार्गदर्शनाखाली जवळपास नऊ वर्षे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केले होते.

चेन्नई सुपर किंग्सने स्टीफन फ्लेमिंग यांना पदावरून हटवल्यानंतर संघात मोठे बदल झाले आहेत. झहीर खान यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकपद सोपवण्यात आल्याने नव्या सपोर्ट स्टाफची नियुक्ती अपेक्षित आहे. चेन्नईकडून हसीलाही प्रशिक्षक पदावरून हटवले जाऊ शकते, मात्र तो आयपीएलमध्ये दुसऱ्या फ्रेंचायझीसोबत राहू शकतो, असे वृत्त यापूर्वी आले होते. त्यामुळे हसीचा पुढचा थांबा मुंबई इंडियन्स असू शकतो.

या शर्यतीत हसीला इंग्लंडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गनचे कडवे आव्हान असेल. मॉर्गनकडे प्रशिक्षणाचा पुरेसा अनुभव नसला तरी तो टी-२० क्रिकेटचा मास्टरमाईंड मानला जातो. कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व केलेल्या मॉर्गनला भारतीय लीगमधील परिस्थितीची उत्तम जाण आहे. मॉर्गनप्रमाणेच ऑस्ट्रेलियाला २०२१ चा टी-२० विश्वचषक जिंकून देणारा माजी कर्णधार आरोन फिंच याच्या नावाचाही विचार होऊ शकतो. फिंचकडेही प्रशिक्षणाचा अनुभव नाही, मात्र राष्ट्रीय संघाचे नेतृत्व आणि आयपीएलमधील विविध फ्रेंचायझींसाठी खेळल्यामुळे त्याच्याकडे उत्तम रणनीती आणि संघाला सोबत घेऊन चालण्याची क्षमता आहे.

या पाच जणांच्या यादीत २०२३-२४ या हंगामात मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केलेल्या मार्क बाऊचरचाही समावेश आहे. याशिवाय, एड्रियन बिरेल हे या यादीतील पाचवे नाव असून ते भारतीय क्रिकेटमध्ये फारसे परिचित नाहीत. क्रिकेट खेळण्याचा कोणताही अनुभव नसलेले ते या यादीतील एकमेव उमेदवार आहेत, मात्र आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेसोबत काम करताना त्यांनी मोठी ख्याती मिळवली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

मुंबई इंडियन्सने त्यांचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांच्यासोबतचा प्रवास अधिकृतपणे थांबवला असून, १७ ऑक्टोबर रोजी त्यांच्या निरोपाची घोषणा केली.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही