🕒 1 min read
मुंबई: निवडणुकीच्या रणधुमाळीत शब्दांचे वार किती तीक्ष्ण आणि जहरी असू शकतात, याचा अनुभव महाराष्ट्राने घेतला. “सत्तेसाठी लोकांची घरं पेटवून स्वतःच्या पोळ्या शेकणारे हे नालायक लोक आहेत,” अशा अत्यंत आक्रमक शब्दांत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाजपचा अक्षरशः पंचनामा केला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंनी भाजपच्या हिंदुत्व आणि कार्यपद्धतीवर थेट बोट ठेवत रान पेटवलंय.
“भाजपची कोणतीही निवडणूक हिंदू-मुस्लिम वादाशिवाय पार पडत नाही. मोदींचं एक भाषण दाखवा जिथे हिंदू-मुस्लिम केलं नाही. ‘कटेंगे तो बटेंगे’ काय किंवा मंगळसूत्र चोरीची भाषा काय… हे लढणारे नाहीत, तर हातपाय गाळणारे आहेत,” असा घणाघात ठाकरेंनी केला. पूर्वी हे आमच्याच ताटात जेवायचे आणि आमच्या जीवावर २०-२५ नगरसेवक निवडून आणायचे, याची आठवणही त्यांनी करून दिली.
Uddhav Thackeray slams BJP Narendra Modi
भाजपच्या नेतृत्वावर वैयक्तिक टीका करताना ठाकरे म्हणाले, “आमच्याकडे प्रबोधनकार आणि बाळासाहेब ठाकरेंचा (Balasaheb Thackeray) ब्रँड आहे. आमच्या घरात परंपरेचा वारसा आहे. पण यांना आगा-पिच्छा नाही, यांना बापाचं नाव लावता येत नाही. यांच्या बापाचं नाव काय?” मुंबईचा महापौर कोण होणार? यावर १ लाख रुपयांचं Open Challenge देत ठाकरेंनी भाजपला ललकारलं आहे.
“मातोश्रीची बदनामी थांबवा, अन्यथा…”
विकृत लोकांना आणि साधू हत्याकांडातील आरोपींना पक्षात घेणाऱ्या भाजपने आम्हाला शिकवू नये, असे खडेबोल त्यांनी सुनावले. “तुम्ही त्या ‘कुत्ता’ आणि प्रफुल्ल पटेलवर का बोलत नाही? मातोश्रीने मोदींना वाचवलं हे विसरू नका,” असा इशारा देत ठाकरेंनी भाजपची कोंडी केली आहे. ठाकरेंच्या या ‘ठाकरी’ शैलीतील हल्ल्याला भाजप आता काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘बाळासाहेबांनी वाचवलं नसतं तर मोदी दिसले नसते…’; उद्धव ठाकरे भावूक, पण डोळ्यातील ‘त्या’ पाण्याचं सत्य काय?
- १५ तासांचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’ संपला; डॉ. संग्राम पाटील अखेर सुटले! ‘या’ एका गोष्टीमुळे टळली अटक?
- ‘ते’ सेक्स स्कँडल आणि मोदी…; डॉ. संग्राम पाटलांची ‘ती’ वादग्रस्त पोस्ट समोर, रविकांत वरपेंचीही एन्ट्री!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










