🕒 1 min read
पुणे – साताऱ्यातील कोयनेच्या खोऱ्यात, दरे गावाजवळ सापडलेल्या ११५ कोटींच्या ड्रग्ज साठ्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. ज्या कारवाईला सुरुवातीला साध्या ‘शेड’वरची धाड म्हटलं गेलं, ती खरंच शेड होती का? या प्रश्नाचं उत्तर शोधताना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. “ती धाड शेडवर पडलीच नाही, तर ती थेट प्रकाश शिंदेंच्या रिसॉर्टवर पडली आहे,” असा मोठा गौप्यस्फोट अंधारे यांनी केला आहे. इतकंच नाही तर, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंचा उल्लेख चक्क ‘ढ’ असा करत त्यांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
“प्रकाश शिंदेंनी दाखवलेले कागद खोटे?”
सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांना लक्ष्य केले. त्या म्हणाल्या, “प्रकाश शिंदे म्हणतात की त्यांनी ती जागा विकली आहे. पण थांबा, त्यांनी जे सर्व्हे नंबर १७ चे कागद दाखवले, ते दिशाभूल करणारे आहेत. कारण सदर प्रॉपर्टी ही सर्व्हे नंबर १३ मध्ये येते.” त्यामुळे ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे थेट उप-मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी (Sushma Andhare) केला आहे.
Sushma Andhare calls Shambhuraj Desai ‘ढ’
“पालकमंत्री म्हणून शंभूराज देसाई ‘ढ’…”
या भागात बेकायदेशीर बांधकाम आणि १२२ मीटरचा रस्ता कुणी बांधला? याची माहिती पालकमंत्र्यांना नसेल तर ते पालकमंत्री म्हणून ‘ढ’ आहेत, असा सणसणीत टोला अंधारे यांनी लगावला. “या अनधिकृत बांधकामाला आणि ड्रग्ज व्यवसायाला पालकमंत्र्यांचा आशीर्वाद आहे का?” असा सवालही त्यांनी (Sushma Andhare) उपस्थित केला.
“स्पॉटवरचा ओंकार डिगे गायब कुठे झाला?”
या प्रकरणात अनेक संशयास्पद गोष्टी घडत आहेत. आर्यन खान प्रकरणात १३ ग्रॅम ड्रग्जसाठी देशभर गदारोळ झाला होता, इथे तर ११५ कोटींचे ४५ किलो ड्रग्ज सापडलेत, तरीही शांतता का? असा प्रश्न अंधारेंनी विचारला. विशेष म्हणजे, रेड टाकणारे पीआय आत्मजित सावंत सध्या कुठे आहेत? आणि घटनास्थळी उपस्थित असलेला ओंकार डिगे गायब का झाला? त्याच्या जीवाला धोका तर नाही ना? असे गंभीर प्रश्न उपस्थित करत त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना जाब विचारला आहे.
इतकंच नाही तर, “किरीट सोमय्यांचा हातोडा आता या अनधिकृत रिसॉर्टवर पडणार आहे का?” असा खोचक सवाल करत त्यांनी (Sushma Andhare) भाजपचीही कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- प्रचाराला विरोध केला म्हणून थेट राडा; एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी दोघांना तुडवलं
- “विलासरावांचे नाव पुसणार?”; रितेश देशमुखांचे भाजप नेत्याला ‘खणखणीत’
- राज ठाकरेंना धक्का; ‘दादर’चा वाघ भाजपच्या गळाला! नितेश राणेंनी ‘असा’ फिरवला गेम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










