Share

सारा तेंडुलकरचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पहिल्यांदाच बोलली अस्खलित मराठी!

Sara Tendulkar’s video speaking fluent Marathi at a jewelry launch goes viral.

Published On: 

Sara Tendulkar's video speaking fluent Marathi at a jewelry launch goes viral. She shares an emotional memory about her grandmother.

🕒 1 min read

Sara Tendulkar- एरवी ग्लॅमरस लूक, पार्टीज आणि कधीकधी डेटिंगच्या चर्चांमुळे हेडलाईनमध्ये राहणारी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) आज एका वेगळ्याच आणि गोड कारणामुळे चर्चेत आली आहे. ‘बाप तसा बेटा’ हे आपण ऐकलंय, पण ‘बाप तशी लेक’ याचा प्रत्यय आज सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांना आला. ज्या साराला आपण नेहमी वेस्टर्न आणि मॉडर्न अवतारात पाहतो, तिने चक्क अस्खलित मराठीत संवाद साधून सर्वांची मनं जिंकली आहेत.

एका ज्वेलरी शोरूमच्या उद्घाटनासाठी सारा उपस्थित होती. माईक हातात घेतल्यावर ती इंग्रजीत बोलेल असं सर्वांना वाटलं होतं. पण साराने थेट मराठीत सुरुवात केली आणि उपस्थितांच्या टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी तिने तिच्या आयुष्यातील एक अत्यंत भावूक आणि खास स्वप्न उपस्थितांशी शेअर केले.

Sara Tendulkar’s ‘that’ video goes viral

आपल्या आजीबद्दलची आठवण सांगताना सारा म्हणाली, “मी लहान असताना माझी आजी मला छोट्या-छोट्या सोन्याच्या वस्तू, कानातले-चेन गिफ्ट द्यायची. तेव्हापासूनच माझ्या मनात एक इच्छा होती की, मोठी झाल्यावर मी स्वतःच्या कमाईतून आजीसाठी काहीतरी खास घेईन. आणि आज माझं ते स्वप्न पूर्ण झालं आहे.” हे बोलताना तिच्या चेहऱ्यावरील आनंद आणि मराठी भाषेवरील तिचे प्रभुत्व पाहून नेटकरी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

काही दिवसांपूर्वीच गोव्यातील सुट्टीत हातात ‘बिअर’ असलेली साराची एक फोटो व्हायरल झाली होती, ज्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. पण आता तिच्या या ‘मराठमोळ्या’ आणि ‘संस्कारी’ अंदाजाने ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे.

एकीकडे साराचं हे कौतुक होत असतानाच, दुसरीकडे तेंडुलकर कुटुंबात लग्नाची लगबग सुरू असल्याची चर्चा आहे. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि त्याची बालपणीची मैत्रीण सानिया यांचा साखरपुडा झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे लवकरच तेंडुलकरच्या घरात सनई-चौघडे वाजणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)