Share

50MP सेल्फी कॅमेरा अन् भन्नाट फीचर्स Samsung Galaxy M55s 5G मिळतोय खूपच स्वस्त 

🕒 1 min read Samsung Galaxy M55s 5G : जर तुम्ही उत्तम फीचर्स आणि बेस्ट कॅमेरासह सॅमसंग स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. होय,  Amazon च्या ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये (Great Republic Day Sale) तुम्हाला सॅमसंगच्या Galaxy M55s 5G वर भन्नाट ऑफर मिळत आहे. या ऑफरचा फायदा घेऊन … Read more

by Aman

Published On: 

Samsung Galaxy M55s 5G with 50MP selfie camera and amazing features is available at a very cheap price

🕒 1 min read

Samsung Galaxy M55s 5G : जर तुम्ही उत्तम फीचर्स आणि बेस्ट कॅमेरासह सॅमसंग स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. होय,  Amazon च्या ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये (Great Republic Day Sale) तुम्हाला सॅमसंगच्या Galaxy M55s 5G वर भन्नाट ऑफर मिळत आहे. या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही कमी किमतीमध्ये एक पावरफुल स्मार्टफोन खरेदी करू शकतात.

या सेलमध्ये तुम्हाला 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज फोनवर तुम्हाला 1000 रुपयांपर्यंतच्या सूटसह 1050 रुपयांपर्यंत कॅशबॅक देण्यात येत आहे. तर दुसरीकडे एक्सचेंज ऑफरसह तुम्ही हा फोन 18500 रुपयांपर्यंत स्वस्तात खरेदी करू शकता. पण हे लक्षात ठेवा की, एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणारी सूट तुमच्या जुन्या फोनची स्थिती, त्याचा ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबून असेल. या सॅमसंग फोनमध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा, 50 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आणि बेस्ट डिस्प्ले मिळणार आहे.

Samsung Galaxy M55s 5G Features

Samsung Galaxy M55s 5G मध्ये कंपनीने 6.7 इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले दिला आहे. तसेच डिस्प्ले 120 हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला आणि 1000 निट्सच्या पीक ब्राइटनेस लेव्हलला सपोर्ट करतो. हा फोन 8 जीबी रॅम आणि 256 जीबी पर्यंतच्या अंतर्गत स्टोरेज पर्यायांमध्ये येतो. प्रोसेसर म्हणून, कंपनी फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7 जनरल 1 देत आहे.

फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे आहेत. यामध्ये 50-मेगापिक्सेलचा मुख्य लेन्स, 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो सेन्सर देखील कंपनीकडून देण्यात आले आहे. तर सेल्फीसाठी फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याच बरोबर फास्ट चार्जिंगसाठी 45 वॅट चार्जर मिळणार आहे. तर हा फोन अँड्रॉइड 14 वर आधारित सॅमसंग वन यूआय 6.1 वर चालतो.

सेफ्टीसाठी या फोनमध्ये तुम्हाला इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळणार आहे. तुम्ही हा फोन थंडर ब्लॅक आणि कोरल ग्रीन या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकतात.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
by Aman

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)