Share

“विलासरावांचे नाव पुसणार?”; रितेश देशमुखांचे भाजप नेत्याला ‘खणखणीत’ उत्तर

Actor Riteish Deshmukh gives a befitting reply to BJP leader Ravindra Chavan’s remark on erasing Vilasrao Deshmukh’s memories from Latur.

Published On: 

Actor Riteish Deshmukh gives a befitting reply to BJP leader Ravindra Chavan's remark on erasing Vilasrao Deshmukh's memories from Latur.

🕒 1 min read

लातूर – राजकारणात टीका-टिपणी चालते, पण दिवंगत नेत्यांच्या आठवणी पुसण्याची भाषा झाल्यावर काय होतं? लातूरमध्ये सध्या नेमकं हेच घडलंय. भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने असं काही विधान केलं की, ज्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पण यावर विलासरावांचे पुत्र आणि अभिनेता रितेश देशमुख याने दिलेलं उत्तर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय. “लिहिलेलं पुसता येतं, पण कोरलेलं नाही…” या एका वाक्यात रितेशने (Riteish Deshmukh) भाजप नेत्याला आरसा दाखवला आहे.

Riteish Deshmukh Reply to BJP Ravindra Chavan

नेमकं काय घडलं?

लातूर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी थेट दिवंगत विलासराव देशमुख यांच्यावर निशाणा साधला. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना चव्हाण म्हणाले, “लातूरमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून सांगतो, शहरातून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील, यात शंका नाही.” लातूरच्या मातीत ज्यांनी आयुष्य वेचलं, त्यांच्याबद्दल असं वक्तव्य केल्याने काँग्रेस कार्यकर्ते आणि लातूरकर चांगलेच संतापले.

यावर रितेश देशमुख शांत कसा बसणार? त्याने मंगळवारी सकाळीच एक व्हिडिओ पोस्ट करून वडिलांच्या अपमानाचा बदला अत्यंत संयमी शब्दांत घेतला. व्हिडिओमध्ये दोन्ही हात वर करून रितेश म्हणतो, “लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही. जय महाराष्ट्र!” रितेशच्या (Riteish Deshmukh) या ‘मोजक्या शब्दांत, पण खणखणीत’ उत्तराने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. सत्तेचा माज दाखवणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर असल्याचं बोललं जातंय.

काँग्रेसचा भाजपला इशारा

दुसरीकडे, काँग्रेसनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपला थेट इशाराच दिलाय. “सत्तेची नशा असलेल्यांना विलासरावांचं लातूरकरांशी असलेलं नातं काय कळणार? भाजपवाल्यांनो याद राखा, याचा करारा जवाब मिलेगा,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. आता लातूरची जनता या ‘मेमरी वॉर’मध्ये कोणाच्या बाजूने कौल देते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)