Share

फडणवीस-शिंदेंना तुरुंगात टाकण्याचा डाव? रश्मी शुक्लांच्या ‘त्या’ रिपोर्टने राजकारणात भूकंप!

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला होता का? रश्मी शुक्लांच्या अहवालाने खळबळ उडाली असून, शुक्लांच्या टायमिंगवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Published On: 

Rashmi Shukla Report Sanjay Pandey conspiracy

🕒 1 min read

मुंबई: राजकारणात सूडाचा प्रवास कुठल्या थराला जाऊ शकतो, याचा धक्कादायक प्रत्यय सध्या महाराष्ट्राला येतोय. खुर्चीसाठी विरोधकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे प्रकार आपण सिनेमात पाहिले असतील, पण हे प्रत्यक्षात घडल्याचा दावा एका अहवालाने केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मविआ काळात ‘फिक्स’ करण्याचा प्लॅन होता का? असा सवाल आता विचारला जातोय.

Rashmi Shukla Report Sanjay Pandey conspiracy

निवृत्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी निवृत्तीच्या अवघे ५ दिवस आधी सरकारकडे सोपवलेल्या एका अहवालाने हा गौप्यस्फोट केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी मीरा-भाईंदरमधील एका प्रकरणात फडणवीस आणि शिंदेंना अडकवण्यासाठी कनिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव टाकला होता. या अहवालात पांडे यांच्यासह डीसीपी लक्ष्मीकांत पाटील आणि एसीपी सरदार पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

हा अहवाल समोर येताच भाजपने उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी थेट प्रश्न विचारलाय, “संजय पांडेंवर कुणाचा दबाव होता? आदेश कोणी दिला? त्यावेळी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कोण होतं?” तर भाजपचे अमित साटम यांनी “२०१९ ते २०२२ काळात ‘उद्धव मामूंनी’ महाराष्ट्रात अराजकता माजवली होती. विरोधकांना जेलमध्ये टाकण्यासाठी खोटे पुरावे आणि व्हिडिओ तयार करण्याचं काम पांडेंनी केलं,” असा गंभीर आरोप केला आहे.

रश्मी शुक्लांच्या टायमिंगवर शंका?

एकीकडे भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असला, तरी दुसरीकडे या अहवालाच्या टायमिंगवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रश्मी शुक्ला या भाजपच्या जवळच्या मानल्या जातात आणि त्यांच्यावर फोन टॅपिंगचे (Phone Tapping) गंभीर आरोप यापूर्वी झाले आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा अहवाल समोर आणून विरोधकांना बदनाम करण्याचं हे षडयंत्र तर नाही ना? अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता पोलीस यावर काय ॲक्शन घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)