मुंबई, 16 ऑक्टोबर: ठाकरे कुटुंबातील आणखी एक सदस्य लवकरच सक्रिय राजकारणात दिसणार का, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. रविवारी झालेल्या एका आंदोलनात तेजस ठाकरे यांनी सहभाग नोंदवल्याने या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी तेजस यांना राजकारणात येण्यासाठी शुभेच्छा देत एक वडिलकीचा सल्ला दिला आहे. तेजसने राजकारणात नक्की यावे आणि पुढे जावे, पण आदित्य ठाकरेंनी जसे स्वतःचे नाव खराब केले तसे करू नये, असे विधान कदम यांनी केले आहे.
आदित्य आणि तेजस हे दोघेही आपल्या मुलांसारखेच असल्याचे सांगत रामदास कदम यांनी त्यांना निस्वार्थ सेवेचा कानमंत्र दिला. जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून त्यांनी काम केल्यास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे त्यांना निश्चितच आशीर्वाद मिळतील, अशी अपेक्षा कदम यांनी व्यक्त केली. तसेच तेजसला त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांनी भरभरून शुभेच्छाही दिल्या.
तेजस ठाकरेंच्या राजकीय सक्रियतेची चर्चा ११ ऑक्टोबर रोजी मुंबईत घडलेल्या एका घटनेनंतर सुरू झाली. शिवाजी पार्क आणि सेना भवन परिसरात 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनाच्या समर्थनार्थ जमलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर ठाकरे गट आणि मनसेचे नेते आक्रमक झाले. यावेळी आदित्य ठाकरेंसोबत तेजस ठाकरेही सेना भवन परिसरात पोहोचले आणि कार्यकर्त्यांच्या सुटकेसाठी झालेल्या ठिय्या आंदोलनात ते सहभागी झाले.
वन्यजीव संशोधन आणि जैवविविधतेच्या कामासाठी प्रामुख्याने ओळखले जाणारे तेजस ठाकरे हे आतापर्यंत सक्रिय राजकारणापासून दूर असल्याचे मानले जात होते. मात्र, याआधीही ते अनेक राजकीय कार्यक्रमांमध्ये उपस्थित असल्याचे दिसले आहे. दसरा मेळावा आणि शिवसेनेच्या वर्धापन दिनाला ते अनेकदा मंचासमोर बसलेले पाहायला मिळाले. तसेच, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंसोबत आणि विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंच्या प्रचारादरम्यान त्यांची उपस्थिती होती.
मुंबई महापालिकेच्या प्रचारावेळी शाखाभेटींच्या दौऱ्यात ते उद्धव ठाकरेंसोबत होते, तर मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंच्या पहिल्या सभेलाही ते उपस्थित राहिले होते. याशिवाय, आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर ते 'मातोश्री'वर आले असता तेजस तिथे दिसले होते. 'नीट' (NEET) पेपरफुटीविरोधात शिवाजी पार्कात झालेल्या आंदोलनातही काळा टी-शर्ट घालून ते सहभागी झाले होते. तसेच, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासोबतचा त्यांचा एक व्हिडीओदेखील यापूर्वी व्हायरल झाला होता.
📌 महत्वाच्या बातम्या
- सत्तेत असताना तुम्ही फेल, आम्हाला मतदानातून बदल हवाय; संदीप देशपांडेंचे भाजपला प्रत्युत्तर
- BAN vs ZIM Dream11 Prediction: बांगलादेश विरुद्ध झिम्बाब्वे त्रिकोणी वनडे मालिकेतील पहिल्या सामन्याची फँटसी टीम आणि खेळपट्टीचा अहवाल
- २०२७ च्या ॲशेससाठी बेन स्टोक्सचे पुनरागमन शक्य: ख्रिस वोक्स
Quick Answers
रामदास कदम यांनी तेजस ठाकरे यांना राजकारणात नक्की येण्याचा सल्ला दिला, मात्र आदित्य ठाकरेंनी जसे स्वतःचे नाव खराब केले तसे करू नये, असे विधान त्यांनी केले.
११ ऑक्टोबर रोजी मुंबईत शिवाजी पार्क आणि सेना भवन परिसरात कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर, त्यांच्या सुटकेसाठी झालेल्या ठिय्या आंदोलनात तेजस ठाकरे सहभागी झाले होते. या घटनेनंतर त्यांच्या राजकीय सक्रियतेची चर्चा सुरू झाली.
तेजस ठाकरे हे प्रामुख्याने वन्यजीव संशोधन आणि जैवविविधतेच्या कामासाठी ओळखले जातात.
जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून काम केल्यास तेजस यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद निश्चितच मिळतील, अशी अपेक्षा रामदास कदम यांनी व्यक्त केली.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







