🕒 1 min read
मुंबई– मुंबई कोणाची? हा प्रश्न जेव्हा जेव्हा निर्माण होतो, तेव्हा तेव्हा मराठी माणसाचं रक्त सळसळल्याशिवाय राहत नाही. पण यावेळी परिस्थिती ‘करो या मरो’ अशीच आहे. “मुंबई वाचवायची असेल तर ही शेवटची लढाई आहे. आता जर हरलात, तर कायमचे संपून जाल,” अशी काळजाचा ठाव घेणारी साद मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवतीर्थावरून घातली आहे. निमित्त होतं ठाकरे बंधूंच्या (Thackeray Brothers) ऐतिहासिक संयुक्त सभेचं!
Raj Thackeray vs BJP Annamalai, Adani Group
‘लाव रे तो व्हिडिओ’: अदानींवर निशाणा पुन्हा एकदा राज ठाकरेंचा ‘लाव रे तो व्हिडिओ’ फॅक्टर चालला. “२०१४ ते २०२४ या काळात गौतम अदानींची (Gautam Adani) संपत्ती कशी वाढली आणि मुंबईच्या जमिनी कशा गिळंकृत केल्या जात आहेत,” याचा धक्कादायक लेखाजोखाच त्यांनी मांडला. “मुंबई आणि एमएमआर रिजन (MMR) अदानींच्या घशात घालण्याचा डाव आहे. सिमेंट उद्योगात नसलेला माणूस थेट दोन नंबरला कसा गेला?” असा सवाल करत त्यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले.
भाजप नेते अन्नामलाई यांनी मुंबई-महाराष्ट्र संबंधांवर केलेल्या विधानाचा राज ठाकरेंनी आपल्या ‘ठाकरी’ शैलीत समाचार घेतला. “मुंबईत एक ‘रसमलाई’ आली होती. तो म्हणतो मुंबईचा महाराष्ट्राशी काय संबंध? अरे भडव्या, तुझा काय संबंध इथे बोलायचा?” अशा तिखट शब्दांत राज यांनी अन्नामलाईंना लक्ष्य केले. कृपाशंकर सिंह यांच्यावरही त्यांनी तोफ डागली. “कोल्हापूर-साताऱ्याची माणसं यांना परकी वाटतात आणि उत्तर भारतीयांना नोकऱ्या हव्यात? बाळासाहेबांचं ‘हटाव लुंगी, बजाव पुंगी’ यासाठीच होतं,” अशी आठवणही त्यांनी करून दिली.
मेवाभाऊ आणि लव्ह जिहाद
दुसरीकडे, उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख ‘मेवाभाऊ’ असा करत भाजपला घेरले. “आम्ही युती केली तर लव्ह जिहाद आणि तुम्ही एमआयएम-काँग्रेससोबत गेलात तर ‘अमर प्रेम’?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “मुंबईला पुन्हा ‘बॉम्बे’ करण्याचा यांचा डाव आहे,” अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांची राज ठाकरेंनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली, हे या सभेचं आणखी एक वैशिष्ट्य ठरलं.
महत्वाच्या बातम्या
- सोन्याने मोडले सर्व रेकॉर्ड, २०२५ मध्ये ६५% उसळी! आता २०२६ मध्ये काय होणार? तज्ज्ञ म्हणतात…
- Share Market Crash: शेअर बाजारात होळी; ३.६३ लाख कोटी स्वाहा! ‘या’ कंपनीला मोठा फटका
- सुपरहिरो की संवेदना? मुंबईच्या आखाड्यात भाजपचा ‘हायटेक’ डाव, तर ठाकरेंची ‘ही’ चाल!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










