Share

पुण्यात बोगस महाविद्यालयाचा पर्दाफाश; प्रवेश न घेण्याचे पुणे विद्यापीठाचे विद्यार्थ्यांना आवाहन

पुण्यात संलग्नता नसतानाही सुरू असलेल्या एका बोगस महाविद्यालयाचा प्रकार समोर आला असून, विद्यार्थ्यांनी तेथे प्रवेश घेऊ नये, असे आवाहन पुणे विद्यापीठाने केले आहे.

Published On: 

Fake college warning Savitribai Phule Pune University

पुणे, 12 ऑक्टोबर: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची कोणतीही संलग्नता नसताना विद्यार्थ्यांना प्रवेश देणाऱ्या एका बोगस महाविद्यालयाचा पुण्यात पर्दाफाश झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयात प्रवेश घेऊ नये, असे जाहीर आवाहन विद्यापीठाकडून (Pune University) करण्यात आले आहे.

‘सिनर्जी फाउंडेशन’च्या ‘सिनर्जी स्कूल ऑफ कॉमर्स पुणे’ असे या वादग्रस्त महाविद्यालयाचे नाव आहे. एका विद्यार्थिनीला या महाविद्यालयाकडून ‘टीसी’ दिला जात नसल्याची तक्रार विद्यापीठाकडे आली होती. त्यानंतर विद्यापीठाने महाविद्यालयाशी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र समोरून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

दूरध्वनीवरून संपर्क न झाल्याने विद्यापीठाने या प्रकरणासाठी एक चौकशी समिती स्थापन केली. या समितीने महाविद्यालयाच्या नोंदणीकृत पत्त्यावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. मात्र, दिलेल्या पत्त्यावर असे कोणतेही महाविद्यालय अस्तित्वात नसल्याचे धक्कादायक वास्तव समितीच्या निदर्शनास आले.

विद्यापीठाच्या मान्यतेशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश देणे हा बेकायदेशीर प्रकार आहे. तसेच, कोणतीही पूर्वपरवानगी न घेता महाविद्यालयाची जागा बदलता येत नाही. या नियमांचे उल्लंघन झाल्याने विद्यापीठाने ‘सिनर्जी स्कूल ऑफ कॉमर्स’वर कारवाई केली आहे.

या कारवाईबाबत विद्यापीठाचे उपकुलसचिव राजेश राहेरकर यांनी एक जाहीर प्रकटन प्रसिद्ध केले आहे. विविध कारणांमुळे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून या महाविद्यालयाला विद्यापीठाने संलग्नीकरण दिलेले नाही. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून विद्यार्थ्यांनी सिनर्जी स्कूल ऑफ कॉमर्समध्ये कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ नये, असे या प्रकटनात स्पष्ट करण्यात आले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही