पुण्यात भिडे पूल वाहतुकीसाठी बंद; ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत राहणार बंद, ‘हे’ पर्यायी मार्ग वापरा

पुण्यातील भिडे पूल गुरुवारपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नव्या पादचारी पुलाच्या कामामुळे पुणे मेट्रोने हा निर्णय घेतला असून नागरिकांना पर्यायी मार्गांचे आवाहन केले आहे.

Published On: 

MHD LOGO

पुणे, 18 नोव्हेंबर: पुण्यातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा भिडे पूल गुरुवार (दि. १९) सकाळी ६ वाजेपासून सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानक आणि पेठ परिसराला जोडणाऱ्या एका नवीन पादचारी पुलाचे बांधकाम सुरू असल्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा पूल ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत बंद राहणार आहे.

मुख्य भिडे पूल वाहतुकीसाठी बंद असला, तरी नदीपात्रातील रस्ता मात्र वाहनांच्या ये-जा करण्यासाठी खुला ठेवण्यात येणार असल्याचे पुणे मेट्रो प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मुठा नदीवरील भिडे पुलावरून हा नवा पादचारी पूल उभारला जात आहे.

या नव्या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर नारायण पेठ, शनिवार पेठ आणि लक्ष्मी रस्ता परिसरातील रहिवाशांना, तसेच या भागात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचणे अधिक सोपे आणि सुरक्षित होणार आहे.

भिडे पूल बंद असलेल्या काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन मेट्रो प्रशासनाने केले आहे. यासाठी नागरिकांनी लकडी पूल, बालगंधर्व पूल आणि झेड ब्रिजचा (Z Bridge) वापर करावा. पादचारी पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असून, या दीड महिन्याच्या कालावधीत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती मेट्रोने केली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही