🕒 1 min read
पुणे – वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या खेडकर कुटुंबाच्या मागे लागलेला ‘साडेसाती’चा फेरा काही संपता संपत नाहीये. यूपीएससी (UPSC) फसवणूक प्रकरण ताजं असतानाच, आता पुण्यात एक थरारक घटना समोर आली आहे. बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी Puja Khedkar हिच्या बाणेरमधील बंगल्यात धक्कादायक चोरीचा प्रकार घडला आहे. घरातील नोकरानेच आई-वडील दिलीप आणि मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांना गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध केलं, तर खुद्द पूजाला दोरीने बांधून ठेवलं. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री?
खेडकर कुटुंबाचा बाणेर (Baner) रस्त्यावर आलिशान बंगला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अवघ्या आठ दिवसांपूर्वीच कामावर ठेवलेल्या एका नेपाळी नोकराने जेवणातून किंवा अन्य मार्गाने दिलीप आणि मनोरमा खेडकर यांना गुंगीचं औषध दिलं. ते बेशुद्ध पडताच त्याने पूजा खेडकरला बांधून एका खोलीत डांबलं. त्यानंतर घरातील सर्वांचे मोबाईल घेऊन हा नोकर पसार झाला.
Puja Khedkar Home Theft Pune
स्वतःची सुटका करण्यासाठी पूजाने मोठी धडपड केली. तिने कसाबसा दरवाजाच्या कडीचा वापर करून स्वतःचे हात मोकळे केले आणि दुसऱ्या फोनवरून चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनला (Pune Police) कॉल केला. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा खेडकर दाम्पत्य बेशुद्धावस्थेत होतं. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
या प्रकरणात एक गोष्ट संशय निर्माण करणारी आहे. चोराने सोन्या-चांदीऐवजी घरातील सदस्यांचे मोबाईल (Mobiles) घेऊन पोबारा का केला? पूजा खेडकरने पोलिसांना कळवलं असलं तरी, अद्याप लेखी तक्रार (FIR) दाखल केलेली नाही. “मानसिक स्थिती ठीक झाल्यावर तक्रार देईन,” असं तिने पोलिसांना सांगितलं आहे.
एकीकडे यूपीएससी परीक्षेत ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा गैरवापर केल्याचा आरोप आणि अटकपूर्व जामीन फेटाळल्याने अटकेची टांगती तलवार, त्यात आता ही घरफोडी. मोबाईल चोरीला गेल्याने या प्रकरणाला वेगळं वळण लागणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “पुरावे खरे असतील तर पवारांची हकालपट्टी करा, नाहीतर…”; ७० हजार कोटींवरून ठाकरेंचा फडणवीसांना ‘अल्टीमेटम’!
- “कुंभमेळ्याचा पैसा ‘पक्षात’ लावण्यासाठी?”; गिरीश महाजनांवर पुण्यातून गंभीर आरोप, अजितदादांनाही ‘तो’ सल्ला!
- “भाजपचे राष्ट्र प्रथम नाही, बलात्कारी, भ्रष्टाचारी प्रथम…”; ठाकरेंचा भाजपवर ‘सर्जिकल स्ट्राईक’!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now







