Share

“एक माणूस समोरून आला अन् माझे XXX पकडले”; प्रिया बापटने सांगितला ‘तो’ धक्कादायक प्रकार

🕒 1 min readPriya Bapat मराठी अभिनेत्री हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला आहे. ती अनेक मालिका, नाटके, चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत असते. तिच्या सुंदर अभिनयामुळे तिला नुकताच झी मराठीचा मराठी पाऊल पढते पूढे हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. ती उत्तम अभिनेत्री आहेच परंतु ती कोणतीही गोष्ट स्पष्टपणे सुद्धा मांडत … Read more

Published On: 

🕒 1 min read

Priya Bapat मराठी अभिनेत्री हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला आहे. ती अनेक मालिका, नाटके, चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत असते. तिच्या सुंदर अभिनयामुळे तिला नुकताच झी मराठीचा मराठी पाऊल पढते पूढे हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. ती उत्तम अभिनेत्री आहेच परंतु ती कोणतीही गोष्ट स्पष्टपणे सुद्धा मांडत असते. तीने नुकताच एका मुलाखतीत आपल्या आयुष्यातील एक भयंकर किस्सा सांगितला आहे.

तिला विचारण्यात आल की तुझ्याबरोबर रस्त्यावरून चालताना कोणती वाईट घटना घडली आहे का? तेव्हा ती म्हणाली, “हो, मी माझ्या आयुष्यातील ही घटना पहिल्यांदाच शेअर करतेय, माझे आई वडिल आणि नवरा सोडून कोणालाच ही गोष्ट माहित नाही.

२०१० मध्ये दादरमध्ये माझ्या घरासमोरच्या गल्लीत ही घटना घडली होती. मी शूट संपवून घरी येत होते. माझ्या हातात सामान होत आणि मी माझ्या मैत्रीणीसोबत फोनवर बोलत चालले होते. कानाला फोन होता. एक माणूस समोरून आला, त्याने माझे स्तन पकडले आणि तो पळून गेला. काय घडलंय हे समजायला मला तीन सेकंद लागले. मी तिथेचं तशीच शांत उभी राहिले नंतर मागे वळून पाहिलं तोपर्यंत तो माणूस पळून गेला होता.”

पूढे प्रिया म्हणाली, “मी तिथून घरी गेले, आई घरी न्हवती. बाबांना कस सांगू काही समजतं न्हवत. मी खुप रडत होते. बाबांनीचं विचारलं काय ग काय झालं? तेव्हा मी त्यांना घडलेली घटना संगितली. मी बाबांकडे बघितलं तेव्हा ते खुप असाहाय्य वाटत होते.

जे घडलं त्याच त्यांना वाईट वाटत होत आणि काय करावं हे समजतं न्हवत. त्यांनी माझं सांत्वनही केलं नाही. हे असं कसं झालं किंवा त्यानी हे तुझ्याबरोबरच कसं केलं असं ही ते म्हणाले नाहीत. कारण ते कुठे त्याला शोधुन काढणार होते.”

ज्या माणसाने हे केले त्याचा उद्देश काय असेल असं विचारल्यावर ती म्हणाली, “त्या माणसाला फक्त आनंद घ्यायचा होता. त्याला वाटलं की हिच्या दोन्ही हातात सामान आहे, त्यामुळे ही काहीच करू शकणार नाही. मी असहाय्य होते आणि त्याने त्या परिस्थितीचा फायदा उचलला या गोष्टीचं जास्त वाईट वाटतं.

तेव्हापासून आजपर्यंत जर मला कोणाची नजर जर वाईट दिसली आणि ती व्यक्ती मला जर स्पर्श करायला आली तर मी आधी त्याला मारेन हीच भावना माझ्या मनात येते. कारण तो तेव्हाचा राग माझ्या मनात अजूनही तसाच आहे.”

Priya Bapat हिने मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, टाईमपास 1-2, वजनदार, मुन्ना भाई एम. बी. बी. एस या आणि अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

तसेच नवा गडी नवं राज्य, वाटेवरती काचा गं, दादा एक गुड न्यूज आहे या नामांकित नाटकांमध्ये काम केले आहे. सा रे ग म प, दामिनी, दादासाहेब फाळके यांसारख्या मालिकांमध्ये तीने काम केले आहे.

Man Misbehaved With Marathi Actress Priya Bapat In Dadar

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!