Share

RR VS LSG | दुखापतीनंतर Comeback करणाऱ्या KL Rahul वर सर्वांच्या नजरा

RR VS LSG  KL Rahul | आयपीएलमध्ये आज दोन सामने खेळवले जाणार आहेत. IPL 2024 च्या चौथ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स एकमेकांशी भिडणार आहेत. या दोन संघांमध्ये सवाई मनिसिंग स्टेडियम जयपूर खेळला जातोय. हा दोन्ही संघांचा या हंगामातील पहिला सामना असणार आहे. दोन्ही संघात आक्रमक फलंदाज असल्यामुळे हा सामना रोमांचक होण्याची शक्यता … Read more

Published On: 

RR VS LSG  KL Rahul | आयपीएलमध्ये आज दोन सामने खेळवले जाणार आहेत. IPL 2024 च्या चौथ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स एकमेकांशी भिडणार आहेत. या दोन संघांमध्ये सवाई मनिसिंग स्टेडियम जयपूर खेळला जातोय.

हा दोन्ही संघांचा या हंगामातील पहिला सामना असणार आहे. दोन्ही संघात आक्रमक फलंदाज असल्यामुळे हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. RR चे नेतृत्व संजू सॅमसन करणार आहे तर LSG ची जबाबदारी KL Rahul वर असणार आहे.

KL Rahul will make a comeback after injury

केएल राहुल हा पायाच्या दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धचे अखेरचे चार कसोटी सामने खेळू शकला न्हवता. तसेच मांडीवर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे तो गतवर्षी चार महिने क्रिकेटपासून दूर होता. त्यामुळे त्याला आता जोरात पुनरागमन करावं लागणार आहेत.

राहुल व्यतिरिक्त LSG मध्ये क्विंटन डिकॉक, देवदत्त पडिकल, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पुरन हे उत्तम फलंदाजी करू शकतात. तसेच लखनऊकडे रवी बिश्नोईसारखा एक उपयुक्त फिरकी गोलंदाज आहे.

RR मध्ये कर्णधार संजू सॅमसन व्यतिरिक्त यशस्वी जायस्वाल आणि जोस बटलर हे उत्कृष्ट फलंदाज आहेत. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करणारा ध्रुव जुरेल हा संघात चांगला फिनिशर आहे. तसेच युझवेंद्र चहलसारखा गोलंदाज राजस्थानकडे आहे. ट्रेंट बोल्ट हा सुद्धा उत्तम गोलंदाजी करतो.

लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ IPL मध्ये तीन वेळा एकमेकांना भिडले आहेत. ज्यामध्ये राजस्थान रॉयल्सने २ वेळा विजय मिळवला आहे. तर केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्सने एकदा विजय मिळवला आहे.

राजस्थानने आयपीएलच्या पहिल्याच हंगामात ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर संघ उत्तम खेळी करू शकलेला नाही तर लखनऊ सुपर जायंट्स आपल्या पहिल्याच हंगामात प्ले ऑफ पर्यंत पोहचला होता.

RR VS LSG Dream11 Match Top Picks

जाॅस बटलर (कर्णधार), संजू सॅमसन, क्विंटन डी कॉक (उपकर्णधार), केएल राहुल, यशस्वी जायस्वाल, रविचंद्रन अश्विन, मार्कस स्टॉयनिस, कृणाल पंड्या युझवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, रवी बिश्नोई

Rajasthan Royals Playing 11

जॉस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), यशस्वी जायस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल, रोव्हमॅन पॉवेल, आवेश खान.

Lucknow Super Giants Playing 11

क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, निकोलस पूरन, केएल राहुल (कर्णधार), क्रुणाल पांड्या, मार्कस स्टोयनिस, दीपक हुडा, शिवम मावी, रवि बिश्नोई, मोहसिन खान, नवीन-उल-हक

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही