MI VS GT | गुजरात-मुंबई आमनेसामने; वाचा MI VS GT संघाची Playing 11

MI VS GT rohit sharma hardik pandya Shubhman gill

MI VS GT | IPL 2024  च्या १७ व्या हंगामाची सुरुवात जबरदस्त झाली आहे. आज दोन सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना RR आणि LSG या दोन संघांमध्ये होणार आहे तर दुसरा सामना हा मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या संघांमध्ये खेळला जाणार आहे. हा सामना संध्याकाळी ७ वाजून ३० मिनीटांनी नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे पार पडणार आहे. मुंबईचे नेतृत्व Hardik Pandya करणार आहे तर गुजरातचे नेतृत्व शुभमन गिल करणार आहे.

Important responsibility on Hardik Pandya

आजच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या हा केंद्रबिंदू असणार आहे. दोन वर्ष गुजरात संघाचे नेतृत्व केल्यानंतर आज GT विरुद्ध तो आपला पहिला सामना खेळणार आहे. हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरातने एक आयपीएल ट्रॉफी मिळवली आहे तर गेल्या वर्षी संघ फायनलमध्ये पोहचला होता. तर मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने संघाला ५ वेळा आयपीएल ट्रॉफी मिळवून दिली आहे. यावर्षी पहिल्यांदाच तो एक फलंदाज म्हणून आयपीएल खेळणार आहे.

Shubman Gill’s first match as captain

या सामन्यात अजुन एका खेळाडूकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे तो म्हणजे Shubhman Gill हार्दिकला मुंबईचे कर्णधार पद मिळाल्यानंतर GT ने शुभमन गिलला गुजरातचे नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली आहे. शुभमन गिलचा कर्णधार म्हणून पहिलाच सामना असणार आहे, त्यामुळे तो कशी कामगिरी करतोय यांचाकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत.

4 players from Mumbai have to deal with injuries

MI ला फिटनेसशी संबंधित अनेक समस्यांशी सामना करावा लागत आहे. मुंबईचे चार खेळाडू दुखापतीतून सावरत आहेत. त्यामध्ये मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव, डावखुरा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फ आणि दिलशान मदुशंका हे दुखापतींमुळे सुरवातीचे काही सामने खेळू शकणार नाहीत तर नवोदित जेराल्ड कोएत्झी देखील स्नायूंच्या ताणातून सावरत आहेत आणि सुरुवातीचे काही सामने खेळणार नाही.

Ishan Kishan will have a remarkable performance in IPL

इशान किशनला उल्लेखनीय कामगिरी करावी लागणार आहे. इशानने आयपीएलमध्ये आतापर्यंत ९१ सामन्यात २३२४ धावा केल्या आहेत, त्यामध्ये १५ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने आयपीएलमध्ये २२० फोर आणि १०३ सिक्स मारले आहेत.

MI vs GT Dream11 Match Top Picks

इशान किशन, रिद्धिमान साहा, रोहित शर्मा (Captain), शुभमन गिल (Vice captain), साई सुदर्शन, राहुल तेवतिया, हार्दिक पंड्या, मोहम्मद नबी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, राशिद खान.

Gujarat Titans Playing 11

शुभमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, केन विल्यमसन, डेव्हिड मिलर,शाहरुख खान, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, उमेश यादव आणि स्पेन्सर जॉन्सन.

Mumbai Indians Playing 11

हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन (यष्टिरक्षक), टीम डेव्हिड, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद नबी, आकाश मधवाल, पियुष चावला, जेराल्ड कोएतझी, नेहल वढेरा

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.