पैश्यासाठी जुगाराचे अ‍ॅप्स प्रमोट करणार नाही; सिद्धार्थ जाधवची मराठी कलाकारांना सणसणीत चपराक

सई ताम्हणकर, स्वप्निल जोशी करतात जुगाराच्या जाहिराती

मराठी अभिनेता Siddharth Jadhav याने आपल्या दमदार अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता सिद्धार्थ जाधव मराठी, हिंदी चित्रपटांसोबतच हॉलिवूडच्या ‘द डिफेक्टिव्ह डिटेक्टिव्हज’ चित्रपटात झळकणार आहे. परितोष पेंटर यांच्या या सिनेमाच्या माध्यमातून तो हॉलिवूडमध्ये इंट्री करणार आहे. ५ एप्रिल २०२४ ला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी त्याने एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपण जुगारीची जाहिरात कधीच करणार नसल्याचं म्हंटल आहे.

माध्यमांशी बोलताना तो म्हणाला, द डिफेक्टिव्ह डिटेक्टिव्हज’ या चित्रपटाच संपूर्ण श्रेय Paritosh Painter सरांना जातं. परितोष पेंटर यांच्यासोबत मी याआधी ‘लोच्या झाला रे’ या सिनेमात काम केले आहे. परितोष पेंटर हे गुजराती आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील मोठे नाव आहे. ‘अफलातून’, ‘थ्री चिअर्स’ आणि ‘द डिफेक्टिव्ह डिटेक्टिव्हज’ सारखे तीन वेगवेगळ्या भाषांतील चित्रपट त्यांनी केले आहेत.

पूढे तो म्हणाला, “एक विनोद तीन वेगवेगळ्या प्रकारे प्रेझेंट होतोय ही एक गंमत आहे. त्यामुळे मी या सिनेमासाठी खूप उत्सुक आहे. इंग्लिश सिनेमासाठी काम करणं खूप छान अनुभव होता. श्वेता गुलाटी, जॉनी लीव्हर, भरत दाभोळकर, तेजस्विनी लोनारी, परितोष पेंटर, जयेश ठक्कर अशी चित्रपटाची तगडी स्टारकास्ट आहे. हे सर्व चित्रपटात वेगवेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत आणि मी सुद्धा पहिल्यांदाचं इंग्रजी सिनेमामध्ये वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे.”

Siddharth Jadhav avoids gambling ads

सोशल मीडियावर जुगारासंबंधित जाहिराती करण्याबाबत मला विचारलं जातं, परंतु अशा जाहिराती करणं मी टाळतो. अशा जाहिरातीच्या माध्यमातून भरपूर पैसे मिळतात पण मला त्या करण्याची इच्छाच होत नाही. जुगारासंबंधित कोणतंही अॅप प्रमोट करणंही मी टाळतो आणि यापुढेही करणार नाही”, असं सिद्धार्थ जाधवने म्हंटल आहे. तसेच आपल्या फिटनेसबद्दल बोलताना तो म्हणाला, आयुष्यात मी दारू, सिगारेट या गोष्टींना कधीच हात लावणार नाही, असं मी माझ्या आईला वचन दिलं होतं. माझी आई नेहमी म्हणायची, जर तुझी व्यसन करण्याची इच्छा झाली तर आमचा चेहरा डोळ्यांसमोर आण. आई-वडिलांना दिलेल्या शब्दाखातर मी कधी व्यसन करत नाही.”

पूढे सिद्धार्थ जाधव म्हणाला, “माझ्याआधी या सिनेमासाठी एका वेगळ्या अभिनेत्यांना विचारण्यात आलं होतं परंतु त्याने काही कारणामुळे हा चित्रपट नाकारला. त्यानंतर या चित्रपटासाठी पारितोष पेंटर सरांनी मला विचारलं. मला मुका असणाऱ्या मानवाची भूमिका मला देण्यासाठी मी त्यांना सांगितलं होतं, परंतु आंधळा असणाऱ्या श्रीची भूमिका किती महत्त्वाची आहे हे त्यांनी मला पटवून दिल. त्यामुळे ही भूमिका करताना मला खूप मजा आली. आता पडद्यावर पाहताना प्रेक्षकांनादेखील मजा येईल. ५ एप्रिल २०२४ रोजी हा सिनेमा देशभर प्रदर्शित होत आहे. कोलकाता, दिल्ली, बंगळूरु, गुजरात या खूप चांगल्या चांगल्या शहरात हा सिनेमा रिलीज होत आहे”.

सिद्धार्थ इंग्रजी सिनेमासाठी घेतलेल्या मेहनतीबद्दल बोलताना म्हणाला, “परितोष सरांना फॉलो करायचं काम मी केलं. इंग्रजी शब्दांच प्रोनाऊन्सेशन खुप कठीण आहे मला ते सहकलाकारांनी शिकवलं. कोणत्या शब्दावर कसा भर द्यायचा हे मला कळलं. सिनेमातील प्रत्येक कलाकाराने मला मदत केली आहे”.

Siddharth Jadhav is king of comedy

मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रिला दोन दशके हसवून सोडणारा विनोदांचा बादशहा म्हणून सिद्धार्थची ओळख आहे. Siddharth Jadhav याने अनेक दूरदर्शन मालिका आणि नाटकांमध्ये सुद्धा काम केले आहे. जत्रा, दे धक्का, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, हुप्पा हुय्या हे त्याचे प्रमुख चित्रपट आहेत. सिद्धार्थ जाधव याने आपल्या विनोदी भूमिकेने सर्वांना खळखळून हसवले आहे.

These Artists in Marathi do gambling advertisements

राष्ट्रवादीकडून ऑनलाईन रमी खेळण्यासाठी जाहीरात करणाऱ्या मराठी आणि हिंदी कलाकारांची यादी काढली आहे. ज्यात अभिनेत्री सई ताम्हणकर,  श्रृती मराठे, अंकुश चौधरी, अमेय वाघ, स्वप्निल जोशी, शिवाजी साटम, मनोज जोशी, शरद केळकर, उमेश कामत, गौरी नलावडे आणि अमृता खानविलकर या मराठी कलाकारांनी जुगारीच्या जाहिराती करताना दिसतात.

महाराष्ट्रात जुगार, मटका किंवा पत्ते खेळण्यास सत्त मनाई आहे. असं करताना कोणीही आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्याती तरतूद करण्यात आली आहे. पण वाढत्या टेक्नलॉजिच्या काळात आता रमी म्हणजेच पत्त्यांचा हा खेळ ऑनलाईन माध्यमातून खेळला जाऊ लागला आहे

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.