Share

Nitesh Rane – राजकाराणातली गंगुबाई ( संजय राऊत ) खुप बोलली एकले – नितेश राणे

Nitesh Rane vs Sanjay Raut : नाणार येथील रद्द झालेला तेल शुद्धीकरण कारखाना बारसू येथे हलविण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी सर्वेक्षण व माती परीक्षण सुरू आहे. मात्र, याला स्थानिकांनी विरोध केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे लवकरच बारसूला जाणार असल्याचे राऊत यांनी सांगितले होते. त्यावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरेंवर टीका केली आहे.

‘कोकण नारायण राणेंच्या बापाचं आहे का? – Sanjay Raut

यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘कोकण नारायण राणेंच्या बापाचं आहे का? बघ कुठे पाय आहेत ते. तुम्ही काय आणि कोणाशी बोलताय? तुम्ही केंद्रीय मंत्री आहात. त्यामुळे तुम्ही हार मानू नका, कोणाची दलाली करत आहात? तुम्ही एकदा कोकणात नाही तर दोनदा पराभूत झालात. तुम्ही केंद्रीय मंत्री आहात, सन्मानाने जगा. महाराष्ट्राची प्रतिष्ठा खराब करू नका,” संजय राऊत नारायण यांना म्हणाले.

‘जर सरकार म्हणतो की बारसूत अंदोलकांवर लाठीहल्ला झालेला नाही, कुठेही अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या नाही. सरकारला या घटना दिसत नसतील तर त्याच्या डोळ्यात मोतीबिंदू आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. जर तुम्हाला काहीच दिसत नसेल तर डोळ्यांवर शस्त्रक्रिया करावी. आंदोलकांना न्यायालयात नेले जात असताना राजापूरच्या न्यायालय परिसरात पोलिसांचा एवढा बंदोबस्त होता की, जणू दहशतवाद्यांना नेले जात आहे,’ अशी टीका संजय राऊत यांनी सरकारवर केली आहे.

महाराष्ट्र राजकाराणातली गंगुबाई संजय राऊत – Nitesh Rane 

यावर आता नितेश राणे यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. राणे म्हणतात, महाराष्ट्र राजकाराणातली गंगुबाई ( संजय राऊत ) खुप बोलली एकले..दलाली करुन आपले घर चालवणारयांनी किती बोलाव..चला बाकी उदया सकाळी..नंगे को ओर नंगा करते है !!

– नितेश राणे

महत्वाच्या बातम्या

Nitesh Rane vs Sanjay Raut : नाणार येथील रद्द झालेला तेल शुद्धीकरण कारखाना बारसू येथे हलविण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी सर्वेक्षण व …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now