State Bank of India | स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

State Bank of India | टीम महाराष्ट्र देशा: बँकेत नोकरीची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 217 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. यामध्ये मॅनेजर 02 जागा, डेप्युटी मॅनेजर 44 जागा, असिस्टंट मॅनेजर 136 जागा, असिस्टंट VP 19जागा, सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव 01जागा, सिनियर एक्झिक्युटिव 15 जागा भरल्या जाणार आहे. या पदांसाठी उमेदवार आजपासूनच ऑनलाइन अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (State Bank of India) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (State Bank of India) पात्र आणि इच्छुक उमेदवार दिनांक 19 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://ibpsonline.ibps.in/sbiscomar23/

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1TZdiiGIihqgpKJDt1ym3jDiDDXJNdoCs/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://sbi.co.in/

महत्वाच्या बातम्या