🕒 1 min read
नवी मुंबई – विमानतळाचं (Navi Mumbai Airport) नाव नक्की कोणाचं असणार? हा वाद आता शांत होण्याऐवजी अधिकच पेटलाय. लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नावासाठी भूमिपुत्र आग्रही असतानाच, आता काँग्रेसने थेट भाजपच्या हेतूवरच बोट ठेवलंय. “भाजपला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचं नाव द्यायचंच नाहीये, तर तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव देण्याचा त्यांचा डाव आहे,” असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. या विधानामुळे ऐन महापालिका निवडणुकीत (Election) राजकीय वातावरण तापलं आहे.
Navi Mumbai Airport Naming controversy
हर्षवर्धन सपकाळ यांनी नवी मुंबईत बोलताना भाजपवर सडकून टीका केली. विमानतळाच्या नावासोबतच त्यांनी पक्षातील गुन्हेगारांच्या प्रवेशावरून भाजपला लक्ष्य केलं. बदलापूर अत्याचार प्रकरणाचा संदर्भ देत ते म्हणाले, “देशात महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना भाजप पक्षात प्रवेश देत आहे. पोक्सो (POCSO) आणि बलात्काराचे गुन्हे असलेल्यांना राजाश्रय मिळतोय. त्यामुळे आता ‘बेटी बचाव’ नाही, तर ‘भाजपकडून बेटी बचाव’ म्हणायचे दिवस आले आहेत.”
निवडणुकीतील बिनविरोध विजयांवरही सपकाळ यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “ईव्हीएमवर जेव्हा ‘नोटा’चा (NOTA) पर्याय उपलब्ध असतो, तेव्हा उमेदवार बिनविरोध कसे काय निवडून येतात? हे लोकशाहीच्या मार्गाने नव्हे, तर गुंडगिरीच्या जोरावर निवडून आले आहेत,” असा थेट हल्लाबोल त्यांनी केला. तसेच अकोट आणि परळीमध्ये भाजपने चक्क AIMIM सोबत छुपी युती केल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
भूमिपुत्र रस्त्यावर उतरणार?
दरम्यान, नावाचा हा तिढा सुटत नसल्याने भूमिपुत्र पुन्हा आक्रमक झाले आहेत. विमानतळाला दि.बा. पाटील (D. B. Patil) यांचे नाव देण्याचा प्रस्ताव विधिमंडळात मंजूर होऊनही तो केंद्राकडे प्रलंबित आहे. यावर खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी इशारा दिला आहे की, “आचारसंहिता संपताच मंत्रालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल आणि जोपर्यंत नाव अधिकृत होत नाही, तोपर्यंत मुंबईतून हटणार नाही.”
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘रणवीर सिंगला ५० दिवसांत विसरतील, पण..’; अभिजीत बिचुकलेंचा नवा दावा!
- BMC Election 2026: ऐन निवडणुकीत भाजप-मनसे भिडले; मोठा राडा, ‘त्या’ एका कारणावरून हाणामारी!
- ‘खिशात पैसे नव्हते, घराचा हप्ता थकणार होता, पण…’; अमृता खानविलकरला आला स्वामींचा ‘हा’ थरारक अनुभव!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










