🕒 1 min read
पुणे – मकर संक्रांतीला ‘लाडक्या बहिणीं’ची ओवाळणी खात्यात जमा होणार की नाही, यावरून आता जोरदार सस्पेन्स निर्माण झालाय. भाजपकडून “१४ तारखेच्या आत ३००० रुपये येणार” असं सांगितलं जात असतानाच, आता राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक मोठं वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. काँग्रेसने थेट निवडणूक आयोगाकडे धाव घेतल्याने आता बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्याची तारीख बदलण्याची दाट शक्यता आहे.
Ajit Pawar Update on Ladki Bahin Yojana Payment Date
झालं असं की, गिरीश महाजन आणि भाजपच्या तेजस्वी घोसाळकर यांनी मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे एकत्र मिळणार असल्याचा दावा सोशल मीडियावर केला होता. मात्र, याला काँग्रेसने आक्षेप घेतला. काँग्रेसने निवडणूक आयोगाला (Election Commission) पत्र लिहून “मकर संक्रांत १४ जानेवारीला आहे, त्यामुळे तोपर्यंत पैसे देऊ नका, १४ नंतर द्या,” अशी मागणी केली. काँग्रेसने आम्ही योजनेच्या विरोधात नाही, पण टायमिंगबद्दल आक्षेप असल्याचं म्हटलंय.
“आयोगाने सांगितलं तर १६ तारखेला…”
काँग्रेसच्या या पत्रावर अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अजितदादा म्हणाले, “जर निवडणूक आयोगाचे निर्देश आले आणि त्यांनी सांगितलं की आता पैसे देऊ नका, तर आम्ही आयोगाचा मान राखू. १४ तारखेचा हप्ता पुढे ढकलून तो १६ तारखेला जमा करू.” त्यामुळे पैसे मिळणार हे नक्की, पण संक्रांतीच्या दिवशी मोबाईल वाजणार की १६ तारखेला, हे आता आयोगाच्या निर्णयावर ठरणार आहे.
“मी आधी केजीएफ पाहतो…”
एकीकडे योजनेचा गोंधळ असताना दुसरीकडे दादांच्या मिश्किल स्वभावाचा प्रत्ययही आला. रोहित पवारांनी (Rohit Pawar) अजितदादांचा उल्लेख ‘KGF’ मधल्या ‘रॉकी भाई’ असा केला होता. यावर हसत हसत दादा म्हणाले, “मी अजून केजीएफ बघितला नाहीये. आधी सिनेमा पाहतो, मग ठरवतो की रोहितने मला रॉकी भाई म्हणणं योग्य आहे की अयोग्य!”
फडणवीसांनाही सडेतोड उत्तर
महापालिका निवडणुकीत युतीधर्मावरून फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केलेल्या टिकेलाही अजित पवारांनी उत्तर दिलं. “मी इथे झालेल्या चुका दाखवल्या तर बिघडलं कुठे? ९ वर्षं निवडणूक झाली नाही, तर मग अन्यायाविरुद्ध आमचा कंठ फुटणारच ना,” असं म्हणत त्यांनी पिंपरी-चिंचवडच्या कारभारावर बोट ठेवलं. तसंच भोसरीचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्यावरही “तो स्वयंपूर्ण आहे, त्याचा कोणी बोलवता धनी नाही,” असा टोला लगावला.
📌 महत्वाच्या बातम्या
- “पदं काढून घ्या, गल्लीत कुणी गणपतीलाही…”; विलासरावांवर बोलणाऱ्या चव्हाणांवर राज ठाकरेंचा घणाघात
- मनोरमा-दिलीप खेडकरांना गुंगीचं औषध, पूजाला बांधून ठेवलं; वादग्रस्त ‘IAS’च्या घरात मध्यरात्री नेमकं काय घडलं?
- “देवाच्या नावाखाली ६० हजार कोटींचा डल्ला?”; राजू शेट्टींचा फडणवीसांवर सर्वात मोठा ‘बॉम्ब’!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










