🕒 1 min read
मुंबई: “लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) पुढचा हप्ता कधी जमा होणार?” सध्या महाराष्ट्रातील करोडो महिलांना हाच प्रश्न पडलाय. विधानसभा निवडणुकीत महायुतीला तारणाऱ्या या योजनेकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. पण आता या लाडक्या बहिणींसाठी एक ‘गुड न्यूज’ समोर येत आहे. जर सगळं ठरल्याप्रमाणे झालं, तर यंदाची तुमची मकर संक्रांत गोड होणार आहे!
Ladki Bahin Yojana Installment Update
खात्यात ३००० रुपये जमा होणार?
सध्या राज्यात महापालिका निवडणुकांचे वारे वाहत आहेत आणि आचारसंहितेमुळे योजनेच्या पैशांना थोडा ब्रेक लागला होता. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार मकर संक्रांतीचं औचित्य साधून महिलांना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे मिळून एकत्र ३००० रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. हे पैसे १४ किंवा १५ जानेवारीला जमा होऊ शकतात, अशी चर्चा सध्या मंत्रालयात सुरू आहे. अर्थात, याबाबत सरकारकडून अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
निवडणुकीची आचारसंहिता आणि विरोधकांचा आक्षेप
या आनंदाच्या बातमीवर एक सावट सुद्धा आहे. १५ जानेवारीलाच राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी (Maharashtra Municipal Election) मतदान पार पडणार आहे. त्यामुळे मतदानाच्या तोंडावर पैसे वाटणे हा आचारसंहितेचा भंग असल्याचा दावा करत विरोधकांनी याला जोरदार आक्षेप घेतला आहे.
नेमकं काय होणार?
एकीकडे लाडक्या बहिणींना ‘तिळगुळ’ देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, तर दुसरीकडे विरोधकांचा आक्षेप. त्यामुळे आता हे ३००० रुपये संक्रांतीलाच मिळणार की निवडणुका झाल्यानंतर? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. पण जर पैसे आले, तर महिलांसाठी हा मोठा दिलासा ठरणार हे नक्की!
📌 महत्वाच्या बातम्या
- “निवडणुकीत पडलात, तरी माज जाईना”; ठाकरेंनी दानवेंची ‘ती’ गोष्ट काढली, सभेत शिट्ट्यांचा पाऊस!
- ‘बाळासाहेबांनी वाचवलं नसतं तर मोदी दिसले नसते…’; उद्धव ठाकरे भावूक, पण डोळ्यातील ‘त्या’ पाण्याचं सत्य काय?
- १५ तासांचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’ संपला; डॉ. संग्राम पाटील अखेर सुटले! ‘या’ एका गोष्टीमुळे टळली अटक?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










