🕒 1 min read
कोलकाता: पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता पुन्हा एकदा एका भीषण घटनेने हादरली आहे. कोलकाता येथील एका प्रतिष्ठित लॉ कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी ( Kolkata rape case ) तिघांना अटक करण्यात आली असून, त्यापैकी एक आरोपी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचा नेता असल्याचे उघड झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घटनेतील पीडित तरुणीने पोलिसांना दिलेली आपबिती मन हेलावणारी आहे.
तक्रारीनुसार, २४ वर्षीय पीडितेने सांगितले की, “३१ वर्षीय मोनोजित मिश्रा याने मला लग्नाचा प्रस्ताव दिला होता. मात्र, त्याचा प्रस्ताव मी नाकारल्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.” तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, आरोपी मिश्रा हा याच कॉलेजमधील माजी विद्यार्थी आणि तृणमूल काँग्रेस विद्यार्थी संघटनेचा पदाधिकारी आहे. त्याने लग्नासाठी पीडितेवर दबाव आणला होता.
Kolkata law student narrates rape ordeal
पीडितेने आरोप केला आहे की, आरोपीने तिच्या प्रियकराला इजा पोहोचवण्याची आणि तिच्या पालकांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवण्याची धमकी दिली होती. घटनेचा क्रम सांगताना पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, “आरोपीने माझ्याशी लैंगिक संबंध ठेवण्याच्या उद्देशाने जबरदस्ती केली. त्यानंतर मी नकार देत प्रतिकार केला. मी रडत-रडत त्याला मला सोडण्यास सांगितलं. मी आरोपीच्या पाया पडले, मला जाऊ देण्याची विनंती केली, पण त्याने ऐकलं नाही आणि मला गार्डच्या खोलीत घेऊन गेला,” असा आरोप पीडितेने केला असल्याचे इंडिया टुडेच्या वृत्तात म्हटले आहे.
या सामूहिक बलात्कार प्रकरणात ( Kolkata rape case ) पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या घटनेतील तीन आरोपींपैकी एक आरोपी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचा नेता असल्याचे समोर आल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या घटनेनंतर संपूर्ण कोलकात्यात संतापाची लाट उसळली असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेषतः एका शिक्षण संस्थेच्या आवारातच असा अमानुष प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा ( Kolkata rape case ) सखोल तपास करत असून, दोषींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- लॉ कॉलेजमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, मोठ्या नेत्यासह तिघांना अटक
- राज्यातील ५१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे, मुंबईत मोठे फेरबदल
- गुणरत्न सदावर्तेला मराठी माणूस जाम चोपेल! भाजपने त्याच्या तोंडाला पट्टी बांधावी, नाहीतर दात उराणार नाहीत!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








