🕒 1 min read
मुंबई – शिवतीर्थ म्हणजे मराठी अस्मितेचा हुंकार… पण याच शिवतीर्थावर जर ‘आमी जे तोमाके भालो बाशी’ किंवा ‘हमको कुछ मालूम नही’ असा आवाज घुमू लागला तर? होय, हे खरंय. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मंचावरून ‘मराठी माणसा’च्या आणि हिंदुत्वाच्या गप्पा मारत होते, आणि दुसरीकडे खाली बसलेली पब्लिक चक्क ‘सेठ ने भेजा है, दिहाडी बुडवून आलोय’ असं सांगत होती. सध्या सोशल मीडियावर आगीसारख्या पसरणाऱ्या या व्हिडिओंनी महायुतीची चांगलीच गोची केली आहे.
Fake Crowd in Devendra Fadnavis – Eknath Shinde Sabha
शिवाजी पार्कवर काल ठाकरे बंधूंची तोफ धडाडली, त्याला उत्तर देण्यासाठी आज महायुतीची जंगी सभा आयोजित करण्यात आली होती. भाषणात एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंचा (Raj Thackeray) समाचार घेताना “काहींना फक्त निवडणुकीतच मराठी माणूस आठवतो, इतर वेळी ‘नेटफ्लिक्स’ आणि इलेक्शन आले की ‘पॉलिटिक्स’ सुचतं,” असा टोला लगावला. पण गंमत म्हणजे, ज्या गर्दीच्या साक्षीने शिंदे हे बोलत होते, त्यातील निम्म्या लोकांना मराठी सोडाच, पण स्टेजवर कोण बोलतंय हे सुद्धा माहित नव्हतं!
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतंय की, सभेला आलेले अनेक लोक हे मध्य प्रदेश (MP) आणि पश्चिम बंगालचे (West Bengal) आहेत. एका पत्रकाराने विचारलं असता, एक व्यक्ती चक्क बंगालीत उत्तर देत होती. काहींना विचारलं ‘कशाची सभा आहे?’, तर उत्तर आलं “शिवाजी की मिटींग है” किंवा “मोदी साहेब येणार आहेत”. प्रत्यक्षात आज मोदींची सभा नव्हतीच. एका कामगाराने तर स्पष्टच सांगितलं, “मालकाने सांगितलं म्हणून आलोय, आजचा पगार (दिहाडी) पण गेला.”
एकीकडे शिंदे गर्जत होते की ‘मराठी माणूस बाहेर फेकला गेला’, आणि दुसरीकडे त्यांच्याच सभेच्या खुर्च्या भरायला परप्रांतीय कामगार आणल्याचे व्हिडिओ समोर आल्याने विरोधकांच्या हाती कोलीत मिळालंय. ही गर्दी प्रेमाची होती की ‘पॅकेज’ची, असा तिखट सवाल आता उपस्थित होतोय.
NDA hiring people from Madhya Pradesh and West Bengal to fill seats at a rally in Mumbai. pic.twitter.com/efO7mciBsN
— Mohammed Zubair (@zoo_bear) January 12, 2026
📌 महत्वाच्या बातम्या
- “देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मालक..”; शिंदेंच्या नेत्याला सुनावताना भाजप नेत्याची जीभ घसरली!
- “महाराष्ट्रात निवडणुका, पण गाड्या परप्रांतीय?”; भाजपच्या ‘त्या’ गाड्या पाहून संताप, भाडं ऐकून डोळे फिरतील!
- “शिंदे जिगरी, अजितदादा जवळचे, पण उद्धव ठाकरे…”; फडणवीसांनी लावली मित्रांची ‘रँकिंग’, ठाकरेंबद्दल मोठं विधान!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










