🕒 1 min read
मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सभा म्हटलं की, शिवाजी पार्कवर पाय ठेवायला जागा नसायची. लोक स्वतःचे डबे घेऊन यायचे, झाडावर चढून भाषणं ऐकायचे. पण आज याच शिवतीर्थावर झालेल्या महायुतीच्या सभेत, “कशाची मिटिंग आहे माहित नाही” असं म्हणणारी गर्दी पाहून तमाम शिवसैनिकांचे मन खिन्न झाले असेल. एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) सभेला परप्रांतीय माणसं आणण्याची वेळ का आली? हा व्हिडिओ पाहिल्यावर समजेल.
Balasaheb Thackeray vs Eknath Shinde Shivaji Park History
बाळासाहेबांच्या एका आवाजावर मुंबई ठप्प व्हायची. पण कालच्या सभेत आलेल्या लोकांना राज्याच्या उप-मुख्यमंत्र्यांचे नावही नीट घेता येत नव्हते. एका समर्थकाने शिंदेंचा उल्लेख चक्क “शिराज सिंग” असा केला. तर काहींनी ही “शिवाजीची मिटिंग” असल्याचा जावईशोध लावला. ज्यांना नेता माहित नाही, पक्ष माहित नाही, आणि भाषाही (मराठी) येत नाही, अशा लोकांच्या भरवशावर शिंदे गट मुंबई जिंकणार का?
शिवतीर्थाचे पावित्र्य भंग?
मराठी अस्मितेचे केंद्र असलेल्या शिवाजी पार्कवर बंगाली आणि हिंदी भाषिक मजुरांची गर्दी जमवून शक्तीप्रदर्शन करण्याचा हा प्रयत्न अंगलट आल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की, हे लोक हे केवळ ‘हजेरी’ लावण्यासाठी आले होते. त्यामुळे खुर्च्या भरल्या असतील, पण मने जिंकली का? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
NDA hiring people from Madhya Pradesh and West Bengal to fill seats at a rally in Mumbai. pic.twitter.com/efO7mciBsN
— Mohammed Zubair (@zoo_bear) January 12, 2026
📌 महत्वाच्या बातम्या
- “देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मालक..”; शिंदेंच्या नेत्याला सुनावताना भाजप नेत्याची जीभ घसरली!
- “महाराष्ट्रात निवडणुका, पण गाड्या परप्रांतीय?”; भाजपच्या ‘त्या’ गाड्या पाहून संताप, भाडं ऐकून डोळे फिरतील!
- “शिंदे जिगरी, अजितदादा जवळचे, पण उद्धव ठाकरे…”; फडणवीसांनी लावली मित्रांची ‘रँकिंग’, ठाकरेंबद्दल मोठं विधान!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










