🕒 1 min read
मुंबई (Mumbai): पहाटेपासून मुंबई विमानतळावर सुरू असलेला तो थरार अखेर संपला आहे. तब्बल १५ तासांच्या चौकशी नाट्यानंतर डॉ. संग्राम पाटील (Dr. Sangram Patil) यांची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांच्या तावडीतून सुटताच ते आपल्या मूळ गावी, जळगाव जिल्ह्यातील एरंडोल (Erandol) कडे रवाना झाले आहेत. मात्र, सुटका झाली असली तरी या प्रकरणाला आता एक नवीन कायदेशीर वळण मिळाले आहे.
डॉ. पाटील यांच्यावर भाजप नेत्यांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. कायदेतज्ज्ञ असीम सरोदे (Adv. Asim Sarode) यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. संग्राम पाटील यांच्याकडे ‘युनायटेड किंगडम’ (UK Citizenship) चे नागरिकत्व आहे. परदेशी नागरिक असल्यामुळेच तांत्रिक अडचणींमुळे भारतीय पोलीस त्यांना अटक करू शकले नाहीत, असा दावा सरोदे यांनी केला आहे.
“हा तर पोलिसांकडून छळ…”
सरोदे यांनी या संपूर्ण प्रक्रियेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. “सत्तेचे सत्य मांडणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी विनाकारण १५ तास अडकवून ठेवले, हा सरळसरळ छळ आहे,” असे म्हणत त्यांनी पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला. माझे डॉ. संग्राम पाटलांशी बोलणे झाले असून ते आता सुरक्षित असल्याची माहितीही त्यांनी दिली.
सुटले, पण ‘ही’ अट कायम!
पोलिसांनी डॉ. संग्राम पाटलांना जाऊ दिले असले, तरी त्यांच्यावर एक महत्त्वाची अट घालण्यात आली आहे. त्यांना भारत सोडून परत जाताना पोलिसांना भेटूनच जावे लागेल, असे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे डॉ. पाटील सध्या गावी जात असले तरी, परदेशात परतताना त्यांना पुन्हा एकदा कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे.
Dr Sangram Patil Released by Mumbai Police
मुंबई (Mumbai) भाजपने सायबर पोलिसांत धाव घेत ज्या पोस्टवर आक्षेप घेतला होता, तो मजकूर आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. १४ डिसेंबर २०२५ रोजी डॉ. संग्राम पाटील यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून एक पोस्ट करण्यात आली होती. यात “मोदींच्या सेक्स स्कँडल बद्दल भाजपा अंध भक्त आणि 40 पैसेवाले सगळे चिडीचूप आहेत..” असा आक्षेपार्ह दावा करण्यात आला होता. याच पोस्टमुळे भाजपचे सोशल मीडिया संयोजक निखिल भामरे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, त्यानुसार ‘शहर विकास आघाडी’ आणि डॉ. पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
- ‘ते’ सेक्स स्कँडल आणि मोदी…; डॉ. संग्राम पाटलांची ‘ती’ वादग्रस्त पोस्ट समोर, रविकांत वरपेंचीही एन्ट्री!
- IND vs NZ: शुबमन गिलची टीम इंडिया सज्ज; पहिला वनडे सामना ‘इथे’ पाहा फ्री!
- “सत्तेचा माज की कायद्याचा बडगा? ‘त्या’ एका पोस्टमुळे डॉ. संग्राम पाटलांवर गुन्हा; पवार ॲक्शन मोडवर!”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












