Share

लंडनहून येताच डॉ. संग्राम पाटलांना पोलिसांनी एअरपोर्टवरच गाठलं; पहाटे २ पासून चौकशी, नक्की प्रकरण काय?

डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. असीम सरोदे यांनी याला छळवाद म्हटले असून निखिल वागळेंनीही निषेध केला आहे.

Published On: 

Dr Sangram Patil Detained Mumbai Airport

🕒 1 min read

मुंबई: सोशल मीडियावर रोखठोक मतं मांडणं आणि सत्याची बाजू घेणं एखाद्याला इतकं महागात पडू शकतं? याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आलाय. लंडनमध्ये स्थायिक असलेले आणि आपल्या निर्भीड विचारांसाठी सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असलेले डॉ. संग्राम पाटील (Dr. Sangram Patil) यांना मुंबई विमानतळावर उतरताच पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या कारवाईमुळे सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Dr Sangram Patil Detained Mumbai Airport

पहाटे २ वाजल्यापासून चौकशीचा फेरा

संग्राम पाटील हे लंडनहून मुंबईत आले असता, एअरपोर्टवरच त्यांना आणि त्यांच्या पत्नीला पोलिसांनी अडवलं. प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ असीम सरोदे (Asim Sarode) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे २ वाजल्यापासून पोलिसांनी त्यांना चौकशीच्या नावाखाली ताब्यात ठेवलं आहे. सरोदे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये याला “अन्यायकारक आणि छळवाद” म्हटलं आहे. संग्राम पाटील हे सोशल मीडियावर सक्रिय आहेत.

‘गुड बिहेवियर’ बॉण्डसाठी दबाव?

पोलिसांकडून डॉ. पाटलांना अटक करण्याची शक्यता कमी असली तरी, त्यांच्याकडून ‘चांगल्या वर्तणुकीचा बॉण्ड’ (Good Behavior Bond) लिहून घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यांना काही अटी आणि शर्तींवर सोडलं जाईल, असं चित्र सध्या दिसत आहे. मात्र, परदेशातून आलेल्या एका प्रतिष्ठित व्यक्तीला अशा प्रकारे तासनतास अडकवून ठेवणं कितपत योग्य आहे? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

“ही तर बिनडोक कारवाई…”

या घटनेवर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagle) यांनी संताप व्यक्त केला आहे. “या बिनडोक कारवाईचा निषेध! संग्राम पाटील यांना लंडनहून मुंबईत उतरताच पोलिसांनी एअरपोर्टवर ताब्यात घेतले,” असे ट्विट करत त्यांनी पोलिसांच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. असीम सरोदे यांनीही इशारा दिला आहे की, “पोलिसांनी कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या दबावाखाली येऊन स्वतःचा गैरवापर होऊ देऊ नये.”

सध्या संग्राम पाटील यांच्यावर नक्की काय कारवाई होणार आणि त्यांना कधी सोडणार, याकडे त्यांच्या हजारो फॉलोअर्सचे लक्ष लागून आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)