Share

Google Pay ची ‘ही’ ट्रिक माहिती आहे का? जाणून घ्या होणार बंपर फायदा

Google Pay: Indian citizens are now using Google Pay in large numbers to make cashless transactions.

by Aman

Published On: 

Do you know this trick of Google Pay

🕒 1 min read

Google Pay  : कॅशलेस व्यवहार करण्यासाठी भारतीय नागरिक आज मोठ्या प्रमाणात गुगल पे चा वापर करताना दिसत आहे. त्यामुळे आता गुगल पे (Google Pay) आपल्या यूजरला एकापेक्षा एक फीचर्स देत आहे. त्यापैकी एक म्हणजे ऑटोपे फीचर.

एखादा यूजर या फीचरच्या मदतीने वारंवार होणारे  व्यवहार जसे की सबस्क्रिप्शन, युटिलिटी बिले आणि इतर सर्व्हिसेस ऑटोमॅटिक करू शकतात. मात्र अनेकदा अनेक युजर्स या फीचरचा फायदा घेत नाही तरी देखील ऑटोपेमुळे त्यांच्या खात्यातून दरमहा पैसे कापले जातात. तर काही युजर्स ऑटोपे रद्द करायला विसरतात, तर काहींना ते कसे करायचे हे माहित नसते. जर तुम्हाला देखील ऑटोपे फीचर थांबवण्याचा असेल तर या लेखात त्याबद्दल सर्वकाही जाणून घ्या.

या स्टेप्स फॉलो करा

सर्वप्रथम तुमच्या डिव्हाइसवर गुगल पे अॅप ओपन करा.

यानंतर ऑटोपे सेटिंग्जवर जा.

येथे तुम्हाला वरच्या उजव्या बाजूला असलेल्या तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करावे लागेल.

यानंतर आता ‘ऑटोपे’ निवडा.

यात सबस्क्रिप्शन सर्च करा यानंतर तुम्हाला तुमच्या सक्रिय ऑटोपे सबस्क्रिप्शनची लिस्ट दिसेल.

यामधून, तुम्हाला जे थांबवायचे असेल ते सबस्क्रिप्शन निवडा.

सबस्क्रिप्शन थांबवण्यासाठी  ‘कॅन्सल ऑटोपे’ वर टॅप करा.

येथे तुम्हाला थांबवण्याची रिक्वेस्ट व्हेरिफाय करण्यास सांगितले जाऊ शकते.

व्हेरिफायसाठी UPI पिन प्रविष्ट करावा लागेल.

यानंतर तुमची ऑटोपे थांबवण्याची रिक्वेस्ट पूर्ण होणार.

Remember some important things

ऑटोपे रद्द करण्याची वेळ किंवा प्रभावी तारीख व्यापाऱ्यावर अवलंबून असेल.

काही प्रकरणांमध्ये, Google Pay अॅपवरून ऑटोपे रद्द केल्यानंतरही, तुम्हाला सबस्क्रिप्शन रद्द करण्यासाठी व्यापाऱ्याशी संपर्क साधावा लागू शकतो.

जर सबस्क्रिप्शन पेमेंट शेड्यूल केले असेल, तर ते रद्द करण्यापूर्वी प्रक्रिया देखील केली जाऊ शकते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
by Aman

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)