Share

WhatsApp वर मेसेजेसना रिप्लाय देण्याचं टेन्शन संपलं, AI फीचरमुळे काम होणार सोपं

व्हॉट्सॲप बिझनेस ॲपमधील एआय आणि ऑटो-रिप्लाय फीचरमुळे कामात व्यस्त असताना मेसेजेसना आपोआप रिप्लाय देणं आता शक्य झालं आहे.

Published On: 

Whatsapp rolling out feature to add social media profile links

मुंबई, 11 ऑक्टोबर: व्हॉट्सॲपवर दररोज येणाऱ्या अनेक मेसेजेसना उत्तर देणं आता सोपं होणार आहे. कामाच्या गडबडीत, क्लासमध्ये किंवा झोपेत असताना नातेवाईक, मित्र आणि ऑफिसच्या मेसेजेसना रिप्लाय देण्याचं टेन्शन आता ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) आणि ऑटो-रिप्लाय फीचरमुळे दूर होणार आहे.

हे खास फीचर सामान्य व्हॉट्सॲपवर नसून, केवळ ‘व्हॉट्सॲप बिझनेस’ (WhatsApp Business) ॲपमध्ये उपलब्ध आहे. प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवर उपलब्ध असलेलं हे ॲप लहान व्यावसायिक, फ्रीलांसर आणि दुकानदारांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. या सुविधेसाठी नवीन नंबर वापरणं किंवा जुन्या नंबरचा चॅट बॅकअप घेऊन वापर करणं अधिक सोयीचं ठरतं.

हे सेट करण्यासाठी अँड्रॉइड युजर्सनी ॲपमधील बिझनेस प्रोफाईलमध्ये जाऊन उजवीकडील तीन डॉट्सवर क्लिक करावं. त्यानंतर ‘बिझनेस टूल्स’मधून ‘अवे मेसेज’ (Away Message) किंवा ‘ग्रीटिंग मेसेज’ (Greeting Message) निवडता येतो. आयफोन युजर्सना हेच पर्याय तळाशी असलेल्या सेटिंग्समधील बिझनेस टूल्समध्ये मिळतील, जिथे ‘सेंड अवे मेसेज’ सुरू करता येतो.

या फीचरमध्ये तुम्ही ‘मी सध्या व्यस्त आहे, संध्याकाळी ६ नंतर संपर्क करेन’ असा लहान आणि थेट मेसेज सेट करू शकता. हा मेसेज कोणत्या वेळी आणि कोणाला (सर्वांना, नवीन नंबरला किंवा निवडक व्यक्तींना) पाठवायचा हे ठरवून बदल सेव्ह करावे लागतात. नवीन व्यक्तीने पहिल्यांदा संपर्क केल्यास ‘ग्रीटिंग मेसेज’ जातो, तर तुम्ही उपलब्ध नसताना ‘अवे मेसेज’ आपोआप सेंड होतो.

बिझनेस अकाउंटवरून ग्राहकांना आपोआप रिप्लाय देण्यासाठी ‘मेटा बिझनेस एजंट’चाही (Meta Business Agent) पर्याय काही निवडक अकाउंट्ससाठी देण्यात आला आहे. टूल्स टॅबमधील ‘एआय एजंट’ पर्याय निवडून, दिलेल्या सूचनांनुसार कोणत्या चॅट्सना एआय रिप्लाय देईल हे ठरवता येतं.

सध्या ही एआय सुविधा काही मोजक्याच देशांमध्ये आणि ठराविक बिझनेस अकाउंट्सना मिळाली आहे. एआयचा वापर फक्त उत्तर तयार करण्यासाठी करायचा की ग्राहकांना आपोआप मेसेज पाठवण्यासाठी, याचा युजर्सनी आधी विचार करावा. तसेच, ग्राहकांना चुकीची माहिती जाऊ नये यासाठी एआयने तयार केलेल्या उत्तरांची पडताळणी करणे महत्त्वाचे आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही