🕒 1 min read
पुणे – राजकारण आणि नाटक यांचं नातं तसं जुनं आहे, पण जेव्हा राज्याचा मुख्यमंत्रीच भर कार्यक्रमात “मी नाटक करतो” अशी कबुली देतो, तेव्हा काय होईल? असाच काहीसा भन्नाट प्रकार पुण्यात घडला आहे. सध्या पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आयोजित केलेल्या ‘संवाद पुणेकरांशी’ या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लावलेली हजेरी आणि तिथे झालेली फटकेबाजी सध्या सोशल मीडियावर चांगलीच गाजतेय.
‘नॅशनल क्रश’ गिरीजा ओक (Girija Oak) हिने मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली. वातावरण हलकं-फुलकं करण्यासाठी गिरीजाने विचारलं, “तुम्हाला नाटकं किंवा सिनेमे बघायला वेळ मिळतो का?” यावर फडणवीसांनी नकारार्थी मान डोलावताच गिरीजाने राजकीय गुगली टाकली. ती मिश्कीलपणे म्हणाली, “नाही, नाटकं बघताय तुम्ही, फक्त ती आम्ही केलेली नाहीत.” यावर क्षणाचाही विलंब न लावता फडणवीसांनी उत्तर दिलं, “नाटकं बघतोय आणि करतोय सुद्धा.. आता काय सांगू?” हे वाक्य ऐकताच सभागृहात उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
Devendra Fadnavis Interview
या गप्पांमध्ये फडणवीसांनी आपल्या आवडीच्या नाटकांचाही उल्लेख केला. त्यांना भरत जाधवचं ‘सही रे सही’ प्रचंड आवडतं. इथेही त्यांनी विरोधकांना चिमटा काढण्याची संधी सोडली नाही. बालपणी पाहिलेल्या ‘तो मी नव्हेच’ (To Me Navhech) या नाटकाचा संदर्भ देत ते म्हणाले, “आता राजकारणात मला अशी अनेक लोकं भेटतात, ज्यांना जाब विचारला की ते बरोबर ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेतात.”
मुख्यमंत्र्यांनी यावेळी आपल्या खोडकर स्वभावाचाही खुलासा केला. एखादा सिनेमा त्यांना आवडला नाही, तर ‘फक्त मीच का सहन करू?’ या विचाराने ते मित्रांना मुद्दाम त्या सिनेमाचं तिकीट काढून देतात आणि त्यांचं ‘छळ’ करतात.
📌 महत्वाच्या बातम्या
- सोन्याने मोडले सर्व रेकॉर्ड, २०२५ मध्ये ६५% उसळी! आता २०२६ मध्ये काय होणार? तज्ज्ञ म्हणतात…
- Share Market Crash: शेअर बाजारात होळी; ३.६३ लाख कोटी स्वाहा! ‘या’ कंपनीला मोठा फटका
- सुपरहिरो की संवेदना? मुंबईच्या आखाड्यात भाजपचा ‘हायटेक’ डाव, तर ठाकरेंची ‘ही’ चाल!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










