Share

“महाराष्ट्रात निवडणुका, पण गाड्या परप्रांतीय?”; भाजपच्या ‘त्या’ गाड्या पाहून संताप, भाडं ऐकून डोळे फिरतील!

“महाराष्ट्रात रोजगाराच्या गप्पा, पण प्रचाराचं कंत्राट मात्र परराज्यात! भाजपच्या ‘परप्रांतीय’ पासिंग गाड्यांवरून संताप, एका गाडीचे ४० हजार भाडं. ‘हाच का तुमचा विकास?’ असा सवाल उपस्थित.”

Published On: 

BJP Campaign

🕒 1 min read

BJP Campaign – स्वतःच्या राज्यातल्या तरुणांना हाताला काम नाही म्हणून ओरड होतेय… पण इथे तर प्रचार करायलाही ‘बाहेरची’ माणसं आणि गाड्या लागतायत की काय? असा प्रश्न सध्या महाराष्ट्राला पडलाय. ‘गती विकासाची’ अशी जाहिरात करणाऱ्या भाजपच्या प्रचार रथांचे ‘MP Passing’ पाहून सध्या अकोल्यात एकच खळबळ उडाली आहे. विकासाच्या गप्पा मारताना कंत्राट मात्र परराज्यातल्या लोकांना दिलं जातंय का? यावरून आता सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.

नेमकं काय घडलं?

अकोल्यातील गोरक्षण ग्राऊंडवर प्रचारासाठी सज्ज असलेल्या भाजपच्या जवळपास ७ गाड्या उभ्या होत्या. या गाड्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे फोटो आणि विकासाच्या घोषणा झळकत होत्या. मात्र, गंमत म्हणजे या सर्व गाड्यांवर महाराष्ट्राचं ‘MH’ नसून चक्क मध्य प्रदेशाचं ‘MP 04’ पासिंग होतं.

Akola News: BJP Campaign Vans with ‘MP 04’ Number Plates

जेव्हा या गाड्यांमधील एका चालकाला विचारलं, “कुठून आलात?” तेव्हा त्याने उत्तर दिलं, “एमपी से आए है, नगर निगम चुनाव के लिए.” विशेष म्हणजे या गाड्या केवळ प्रचारासाठी तिथून मागवण्यात आल्या आहेत. स्थानिक चंद्रकांत झटाले यांनी जेव्हा अधिक चौकशी केली, तेव्हा समोर आलेला आकडा धक्कादायक होता. एका गाडीचं भाडं तब्बल ३८ ते ४० हजार रुपये असून डिझेलचा खर्च (Diesel Cost) वेगळा आहे.

महाराष्ट्रात रोजगार आणणार? आधी भाजप प्रचाराचे कंत्राट तरी मराठी माणसाला द्या!

चंद्रकांत झटाले यांनी फेसबुक पोस्ट लिहित भाजपच्या या ‘परप्रांतीय प्रेमा’चा खरपूस समाचार घेतला आहे. “सगळ्या गाड्या एकाच कॉन्ट्रॅक्टरच्या आहेत आणि तोही मध्य प्रदेशचा. म्हणजे महाराष्ट्रातल्या निवडणुकीत खर्च होणारा पैसा जाणार मध्य प्रदेशात? अहो, किमान महाराष्ट्रातल्या लोकांना तरी कामं द्या,” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

“स्वतःच्या राज्यातल्या गाड्यांना काम नाही, आणि भाजपला मात्र ‘इम्पॉर्टेड’ गाड्यांची हौस! महाराष्ट्रात रोजगाराची स्वप्नं विकणाऱ्यांनीच प्रचाराचं कंत्राट देताना मराठी माणसाला वाऱ्यावर सोडलं! प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्यांचे लाखो रुपये परराज्यात जात आहे. ‘आम्ही फक्त मते द्यायची का? आणि आमच्या हक्काचा रोजगार मात्र बाहेरच्यांना?’ हा प्रश्न आता प्रत्येक सुशिक्षित बेरोजगार विचारू लागला आहे.”

महाराष्ट्रात रोजगार आणण्याच्या वलगना करणाऱ्यांनी प्रचाराचं कामही स्थानिक कंत्राटदारांना का दिलं नाही? या प्रश्नामुळे सध्या अकोल्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. आता यावर भाजपचे स्थानिक नेते काय स्पष्टीकरण देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

Web- Why MP Vehicles for Maharashtra Campaign? BJP Faces Heat over ‘Outsourcing’ Controversy

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)