Share

Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस’ला रीलस्टारचा दणका; थेट कोर्टात खेचण्याची धमकी, कारण वाचून थक्क व्हाल!

बिग बॉसच्या घरात एन्ट्री न मिळाल्याने रीलस्टार महेश मोटे आक्रमक झाला आहे. फसवणूक केल्याचा आरोप करत त्याने शोच्या निर्मात्यांना थेट कायदेशीर नोटीस पाठवण्याचा इशारा दिला आहे.

Published On: 

Bigg Boss Marathi 6: रीलस्टार महेश मोटेची 'लिगल नोटीस'

🕒 1 min read

Bigg Boss Marathi 6 – बिग बॉसच्या घरात यंदा कोण जाणार, याची चर्चा सध्या नाक्या-नाक्यावर सुरू आहे. पण थांबा, शो सुरू होण्याआधीच एक मोठी खळबळ उडाली आहे. ज्या शोमध्ये एन्ट्री मिळवण्यासाठी लोक काय वाट्टेल ते करायला तयार असतात, त्याच शोच्या निर्मात्यांना आता एका रीलस्टारने चक्क कोर्टाची पायरी दाखवण्याचा इशारा दिलाय. पुण्यातील रीलस्टार महेश मोटेने केलेल्या आरोपामुळे मराठी मनोरंजन विश्वात एकच चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर आपल्या वादग्रस्त आणि हटके रिल्समुळे चर्चेत असणारा रीलस्टार महेश मोटे (Mahesh Mote) याने बिग बॉसच्या टीमवर गंभीर आरोप केले आहेत. महेशच्या म्हणण्यानुसार, त्याला शोमध्ये सहभागी होण्यासाठी खुद्द बिग बॉसच्या टीमकडूनच निमंत्रण आलं होतं. क्रिएटिव्ह मीटिंगसाठी त्याला बोलावण्यात आलं, चर्चा झाली. पण ऐनवेळी ‘आमची स्पर्धकांची यादी फायनल झाली आहे, तुम्हाला घेता येणार नाही’ असं सांगत त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

Mahesh Mote Legal Notice to Bigg Boss Marathi

महेशने जेव्हा आपला वेळ वाया गेला म्हणून किमान प्रवासाचा खर्च (Travel Allowance) मागितला, तेव्हा त्याला “तुमच्यासारखे २००-४०० लोक आम्ही रोज बोलावतो”, असं उद्धट उत्तर मिळाल्याचा दावा महेशने केला आहे. एका मराठी कलाकाराची आणि सामान्य माणसाची अशी अवस्था केल्याने महेशची ‘तळपायाची आग मस्तकात’ गेली आहे.

फक्त सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून महेश थांबला नाही, तर त्याने थेट पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टात धाव घेतली आहे. त्याचे वकील वाजिद खान यांनी स्पष्ट केलंय की, “एका गरीब माणसाला आशेने बोलावून असा अपमान करणं चुकीचं आहे. आम्ही बिग बॉसच्या विरोधात कायदेशीर लढाई लढणार आहोत.”

इतकंच नाही तर, लवकरच पुण्यात एक मोठी ‘प्रेस कॉन्फरन्स’ घेऊन बिग बॉसचा ‘खरा चेहरा’ आणि पडद्यामागची काळी बाजू जगासमोर मांडणार असल्याचा इशारा महेश मोटेने दिला आहे. “बिग बॉसने महेश मोटेला हलक्यात घेतलंय, पण आता त्यांना इंगा दाखवणार,” असं महेशने त्याच्या व्हायरल व्हिडिओमध्ये म्हटलंय. त्यामुळे शो सुरू होण्याआधीच हा ‘बिग ड्रामा’ आता कोर्टात पोहोचणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)