🕒 1 min read
मुंबई – सोशल मीडियावर एखाद्याच्या आयुष्याचा ‘तमाशा’ करायला लोकांना वेळ लागत नाही, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री माही विज (Mahhi Vij) आणि जय भानुशाली यांचा नुकताच घटस्फोट झाला. हे जोडपं वेगळं झाल्याने चाहते आधीच धक्क्यात होते, पण आता माहीच्या चारित्र्यावर बोट ठेवणारा एक भयंकर प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावरील काही रिकामटेकड्या ट्रोलर्सनी माहीचे नाव थेट तिचा बेस्ट फ्रेंड नदीम नाज (Nadeem Naz) याच्याशी जोडायला सुरुवात केली.
या घाणेरड्या अफवा पसरवणाऱ्यांना आता अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिने चांगलंच फैलावर घेतलं आहे. आपल्या जीवलग मैत्रिणीबद्दल अशा चर्चा ऐकून अंकिताचा पारा चढला आणि तिने इन्स्टाग्रामवर एक जळजळीत पोस्ट शेअर केली.
Mahhi Vij and Ankita Lokhande
काही दिवसांपूर्वी नदीम नाजच्या वाढदिवसानिमित्त माहीने एक पोस्ट शेअर करत त्याला ‘बेस्ट फ्रेंड’ म्हटलं होतं. नेटकऱ्यांनी याचा वेगळाच अर्थ काढला आणि घटस्फोटाचं खापर नदीमवर फोडायला सुरुवात केली. यावर संताप व्यक्त करत अंकिता लोखंडे म्हणाली, “नदीम भाई हे माही आणि जयसाठी नेहमीच एका वडिलांसारखे राहिले आहेत. मैत्रीच्या नात्याला वेगळं नाव देताना लाज वाटली पाहिजे.”
जिथे लोक नातं तुटल्यावर एकमेकांवर चिखलफेक करतात, तिथे माही आणि जय आपल्या मुलीसाठी आजही उत्तम ‘को-पॅरेंटिंग’ करत आहेत. अंकिताने ११ जानेवारी रोजी शेअर केलेल्या स्टोरीमध्ये या दोघांच्या समंजसपणाचं कौतुक केलंय. “माही आणि जयच्या वैयक्तिक आयुष्याचा आदर करा, नसत्या अफवा पसरवू नका,” अशा कडक शब्दांत अंकिताने ट्रोलर्सना इशारा दिला आहे. मैत्रीण असावी तर अंकितासारखी, जी कठीण काळात ढाल बनून उभी राहिली, अशी चर्चा आता चाहत्यांमध्ये रंगली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘माझा संयम कायम, पण दादांचा सुटलाय’; फडणवीसांचा पुण्यात मोठा गौप्यस्फोट!
- ‘९ वर्षे निवडणुका नाहीत तर कंठ कसा फुटणार?’; दादांचा फडणवीसांवर जोरदार पलटवार!
- दि.बा. पाटलांचं नाव नको, Navi Mumbai विमानतळाला ‘मोदीं’चं नाव देण्याचा डाव? काँग्रेसचा खळबळजनक आरोप!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










