Share

‘खिशात पैसे नव्हते, घराचा हप्ता थकणार होता, पण…’; अमृता खानविलकरला आला स्वामींचा ‘हा’ थरारक अनुभव!

कोरोना काळात अमृता खानविलकरवर मोठं आर्थिक संकट ओढवलं होतं. मात्र, घरातल्या स्वामी समर्थांच्या फोटोमुळे तिचं नशीब कसं पालटलं, याचा भावूक किस्सा तिने शेअर केला आहे.

Published On: 

Amruta Khanvilkar, Swami Samarth

🕒 1 min read

संकट काळात जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात, तेव्हा एक खिडकी उघडी असते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय… आणि हा अनुभव दुसरा-तिसरा कोणाला नसून मराठी सिनेसृष्टीची ‘चंद्रमुखी’ अर्थात अभिनेत्री अमृता खानविलकरला आला आहे. पडद्यावर ग्लॅमरस दिसणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यातही किती भयावह वादळं येतात आणि त्यातून सावरताना श्रद्धेची ताकद कशी उभी राहते, याचा एक अंगावर काटा आणणारा किस्सा सध्या चर्चेत आहे.

अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या वाईट काळावर भाष्य केलं. अमृताने मुंबईतील पॉश अशा लोखंडवाला परिसरात एक घर घेतलं होतं. सगळं काही सुरळीत सुरू असतानाच देशात कोरोनाने (COVID-19) हाहाकार माजवला. कामं बंद झाली, शूटिंग थांबलं आणि बघता बघता अमृताच्या सेव्हिंग्सचा तळ दिसू लागला. परिस्थिती इतकी बिकट झाली की, घराचा EMI भरण्याइतकेही पैसे शिल्लक राहिले नव्हते.

Amruta Khanvilkar shared an emotional story

कर्ज फेडता येईना म्हणून शेवटी घर भाड्याने देण्याचा निर्णय घेतला, पण तिथेही यश येत नव्हतं. अखेर एक दिवस एक व्यक्ती घर पाहायला आली. त्यांनी घर पाहिलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी एग्रीमेंट करायला तयार झाले. अमृताने आश्चर्याने विचारलं, “तुम्ही इतक्या लवकर निर्णय कसा घेतला?” तेव्हा त्या व्यक्तीने दिलेलं उत्तर ऐकून अमृता थक्क झाली. ती व्यक्ती म्हणाली, “तुमच्या देवाऱ्यात स्वामी समर्थांचा फोटो दिसला. मी त्यांना खूप मानतो. जिथे स्वामी आहेत, तिथे मी राहायला तयार आहे.”

हे शब्द ऐकताच अमृताला (Amruta Khanvilkar) रडू कोसळलं. हा केवळ योगायोग नसून ती स्वामींची कृपा होती. तिने मंदिरात धाव घेतली आणि स्वामींची माफी मागितली. “मला वाटलं तुमचं माझ्याकडे लक्ष नाही, पण तुम्हीच हे संकट दूर केलंत,” असं म्हणत तिने स्वामींचे आभार मानले. विशेष म्हणजे, ते भाडेकरू त्या घरात तब्बल ३ वर्षे राहिले आणि अमृताचा सर्वात मोठा आर्थिक ताण नाहीसा झाला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)