🕒 1 min read
पुणे – सत्तेत मांडीला मांडी लावून बसायचं आणि स्थानिक मैदानात मात्र एकमेकांचे कपडे फाडायचे, असा काहीसा प्रकार सध्या महायुतीत सुरू आहे की काय? पिंपरी-चिंचवडच्या आखाड्यात सध्या असाच राजकीय ‘दंगल’ पाहायला मिळतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) पुण्यातून सडेतोड उत्तर दिलं आहे. फडणवीसांच्या ‘कंठ फुटला’ या विधानाचा समाचार घेताना दादांनी थेट ९ वर्षांचा हिशोबच मांडला.
“चुका दाखवल्या तर युतीधर्म मोडला का?”
काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधताना, “निवडणुका आल्या की काहींचा कंठ फुटतो,” असा टोला लगावला होता. यावर अजित पवारांनी थेट सवाल केला आहे. ते म्हणाले, “अहो, ९ वर्ष निवडणुकाच झाल्या नाहीत, तर कंठ फुटणार कसा?” मी इथे महापालिका निवडणूक लढवतोय. इथे झालेल्या चुका दाखवल्या, तर युतीधर्म पाळला नाही असं होत नाही, असंही त्यांनी स्पष्ट शब्दांत ठणकावून सांगितलं.
Ajit Pawar reply Devendra Fadnavis PCMC Election 2026
पिंपरी-चिंचवडमधील भाजप आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) आणि अजित पवार यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचलाय. लांडगेंनी अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत, “आम्ही काय बांगड्या भरल्या नाहीत, जन्मत:च लंगोट घालणारे आम्ही आहोत,” अशा शब्दांत चॅलेंज दिलं होतं. इतकंच नव्हे तर, “मोदींनी ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख केला अन् संध्याकाळी हे भाजपमध्ये आले,” असा घरचा आहेरही लांडगेंनी दिला होता.
महेश लांडगेंच्या या एकेरी टीकेवर अजित पवारांनी आपल्या खास शैलीत मिश्किल पण मार्मिक भाष्य केलंय. जास्त काही न बोलता दादा म्हणाले, “तो खूप मोठा आहे. तो स्वयंपूर्ण आहे. त्याचा बोलवता धनी कोणी नाही. भोसरीमधली लोक स्वयंपूर्ण, स्वयंभू असतात.” अजित पवारांनी मोजक्या शब्दांत लांडगेंना उत्तर देत चेंडू पुन्हा भाजपच्या कोर्टात टोलवला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- दि.बा. पाटलांचं नाव नको, Navi Mumbai विमानतळाला ‘मोदीं’चं नाव देण्याचा डाव? काँग्रेसचा खळबळजनक आरोप!
- ‘रणवीर सिंगला ५० दिवसांत विसरतील, पण..’; अभिजीत बिचुकलेंचा नवा दावा!
- BMC Election 2026: ऐन निवडणुकीत भाजप-मनसे भिडले; मोठा राडा, ‘त्या’ एका कारणावरून हाणामारी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










